ठाणे

डोंबिवलीत अडीच वर्षांच्या मुलीची हत्या करून आईची आत्महत्या

डोंबिवली पूर्व येथील ‘रुणवाल मायसिटी’ या गृहसंकुलात अडीच वर्षांच्या मुलीची हत्या करून तिच्या आईने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली.

Swapnil S

डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील ‘रुणवाल मायसिटी’ या गृहसंकुलात अडीच वर्षांच्या मुलीची हत्या करून तिच्या आईने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल सकपाळ हे ‘रुणवाल मायसिटी’ येथे आपली आई स्नेहा, पत्नी पूजा आणि मुलगी समृद्धी यांच्यासह राहत होते. राहुल ऐरोली येथील एका कंपनीत सीनियर असोसिएट पदावर कार्यरत आहेत. रविवारी दुपारी साडेतीन वाजता ते सोसायटीतील मीटिंगसाठी घराबाहेर पडले होते. राहुल हे रात्री सुमारे सात वाजता घरी आले व नंतर ते चायनीज खाण्यासाठी बाहेर गेले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ते घरी परतले असता बेल वाजवूनही पत्नी पूजाने दरवाजा उघडला नाही. त्यांनी पूजाला फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे राहुल यांनी आईला मोबाईलवर कॉल करून पूजा फोन उचलत नाही सांगत दरवाजा उघडायला सांगितले.

थोड्याच वेळात राहुल यांना घरातून आईच्या ओरडण्याचा आवाज आला. आईने दरवाजा उघडताच पूजाने घराच्या हॉलमध्ये सिलिंग फॅनला साडीच्या साह्याने गळफास घेतल्याचे आढळून आले, तर जमिनीवर निपचित पडलेल्या अवस्थेतील मुलगी समृद्धीच्या गळ्याभोवती रूमाल गुंडाळलेला होता. तसेच बाजूला उशी पडली होती. राहुल यांनी आईला घडलेल्या प्रकाराबाबत विचारले असता, मी बेडरूममध्ये झोपली होती, असे त्यांनी सांगितले. पूजा कोणताही प्रतिसाद देत नव्हती, तर समृद्धीला खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू केली आहे.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव