भाईंंदर : भाईंदर पूर्वेच्या नवघर गावाच्या शेजारी विकासकांना कांदळवन झाडे व त्याचा बफर झोन नवीन इमारती बांधताना बाधा ठरत असल्याने विकासकांनी व स्थानिक राजकीय लोकांनी मिळून त्यावर कांदळवन (मँग्रोव्ह) झाडांवर विषबाधा करून त्यांना सुकवून नंतर कटर मशीनच्या सहाय्याने कापून टाकल्याने तसेच वन विभागाच्या अहवालात कांदळवनाची कत्तल करून विषबाधा केल्याचे निष्प्रन झाल्याने मीरा-भाईंदर अप्पर तहसीलदार यांच्या आदेशान्वये नवघर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर त्याठिकाणी बफर झोनमध्ये बांधत असलेल्या इमारतींना मीरा-भाईंदर शहरात भूमाफियाकडून कांदळवन क्षेत्रात माती भराव करून तिवरांच्या झाडांची कत्तल केल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. याबाबत महापालिका, महसूल विभागाकडून ठोस कारवाई केली जात नसल्याने यामध्ये वाढ होत आहे. असाच प्रकार भाईंदर पूर्वेच्या मौजे नवघर परिसरात तिवरांच्या झाडांची कत्तल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारीनुसार नवघर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या जागेत तिवरांची झाडे तोडल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
त्यानुसार तिवरांची झाडे कटर मशीनच्या सहाय्याने कापलेली असल्याने उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लघंन केले आहे.
त्यामुळे संबंधितावर पर्यावरण (संरक्षण) अधिनियम अन्वये अप्पर तहसीलदार निलेश गौंड यांच्या आदेशानुसार दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक धिरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण धनवडे हे करत आहेत.