ठाणे

कल्याणमध्ये रात्रीची स्वच्छता मोहीम; धुळीच्या प्रदूषणाची समस्या कमी करण्याचा पालिकेचा उपक्रम

धुळीच्या प्रदूषणाची समस्या कमी करण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार रात्रीच्या वेळी रात्री १० ते ३ या कालावधीत विशेष स्वच्छता मोहीम राबविली जात आहे.

Swapnil S

कल्याण: धुळीच्या प्रदूषणाची समस्या कमी करण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार रात्रीच्या वेळी रात्री १० ते ३ या कालावधीत विशेष स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. ही विशेष स्वच्छता मोहीम ४ पॉवर स्विपींग मशीन, २०० कर्मचारी यांच्या सहाय्याने राबविण्यात येत आहे. रात्रीच्या कालावधीत डीप क्लिनिंग व सकाळच्या प्रहरात कचरा उचलण्याच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक पॉवर स्विपींग मशीनच्या मागे ५० कर्मचाऱ्यांची टीम असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली. कल्याण शहर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपुरक होण्यासाठी हा उपक्रम राबवित असल्याचे माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त अतुल पाटील यांनी दिली आहे.

३ टन धूळ संकलित करण्याची क्षमता

या पॉवर स्विपींग मशीन्समध्ये सुमारे ३टन धूळ संकलित करण्याची क्षमता असून, रस्त्यावरून मशीनद्वारे साफ-सफाई करताना धूळ उडू नये,म्हणून त्यावर वॉटर स्प्रींकलर बसविण्यात आले आहेत. तसेच रस्त्यातील दुभाजक धुण्यासाठी यामध्ये हायप्रेशर जेट स्प्रेची यंत्रणा उपलब्ध करण्यात आलेली आहे. ही मशीन सक्शन तत्वावर आधारीत असून, सक्शन यंत्रणेद्वारे रस्त्यावरील धूळ, माती शोषून घेतली जाते. त्यानंतर मशीनच्या मागील टँकमध्येत ती गोळा होते.

३ टन धूळ संकलित करण्याची क्षमता

या पॉवर स्विपींग मशिन्समध्ये सुमारे ३ टन धूळ संकलित करण्याची क्षमता असून, रस्त्यावरून मशीनद्वारे साफ-सफाई करताना धूळ उडू नये,म्हणून त्यावर वॉटर स्प्रींकलर बसविण्यात आले आहेत. तसेच रस्त्यातील दुभाजक धुण्यासाठी यामध्ये हायप्रेशर जेट स्प्रेची यंत्रणा उपलब्ध करण्यात आलेली आहे. ही मशीन सक्शन तत्त्वावर आधारित असून, सक्शन यंत्रणेद्वारे रस्त्यावरील धूळ, माती शोषून घेतली जाते. त्यानंतर मशीनच्या मागील टँकमध्ये ती गोळा होते.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या