ठाणे

सात दिवसांत महापालिकेतील कार्यालय खाली करण्याच्या नोटिसा

वृत्तसंस्था

उल्हासनगर पालिकेतील कामगार संघटनांना त्यांची कार्यालये खाली करण्याच्या अंतिम नोटिसा आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी बजावल्या आहेत. त्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटना, लेबर फ्रंट कामगार संघटना, भारतीय कामगार कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना, शासकीय वाहनचालक संघटना यांना आपले कार्यालय खाली करण्याची नोटीस महापालिकेने बजावली आहे. नोटीस मिळाल्यापासून आपल्या संघटनेस महानगरपालिके मार्फत पुरवण्यात आलेली कार्यालये ७ दिवसात शांतपणे खाली करून पालिकेच्या ताब्यात देण्यात यावीत.

विहित कालावधीत कार्यालये खाली करून ताब्यात दिल्या नाहीत तर कायदेशीर कारवाईद्वारे कार्यालयांना ताब्यात घेणे भाग पडेल असा इशारा या संघटनांना पालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.

यासोबतच शासन मान्यताप्राप्त नसलेल्या संघटनांकडून प्राप्त होणाऱ्या कुठल्याही निवेदनाची, अभिवेदनाची किंवा पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही असेही नोटीसीमद्ये नमूद करण्यात आले आहे.

आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, पालिकेतील अतिरिक्त आयुक्त (सेवा) डॉ. करुणा जुईकर, उपआयुक्त मुख्यालय अशोक नाईकवाडे यांना नोटीसीची प्रत दिली आहे. या ५ संघटना कामगारांच्या विविध मागण्यांसाठी किंबहूना लढा देण्याकरिता पालिकेत सक्रिय असून त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत. आता या संघटनांची कार्यालये खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्याने कामगारांचे प्रश्न, समस्या कोण उचलणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

साताऱ्यात शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या सभा वेटिंगवर

म्हस्केंच्या उमेदवारीमुळे महायुतीत सुंदोपसुंदी; नवी मुंबईतील ६४ माजी नगरसेवकांचे राजीनामे

माजी आमदार उपरकर 'उबाठा' पक्षात प्रवेश करणार? आज उद्धव ठाकरे कणकवलीत आल्यानंतर भेट घेणार

राहुल गांधी रायबरेलीतून, अमेठीतून के. एल. शर्मा यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर

तीन RTO अधिकाऱ्यांना अटक, चोरीच्या वाहनांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा नवी मुंबई क्राईम ब्रांचकडून पर्दाफाश