ठाणे

उरण तालुक्यातील पाण्याचे संकट दूर,रानसई धरण ओव्हरफ्लो

वृत्तसंस्था

रानसई धरण क्षेत्रात गेल्या दिवसांत चांगला पाउस झाल्यामुळे हे धरण १०० टक्के भरल्यामुळे ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे संकट दूर झाले आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून रानसई धरण क्षेत्रात जवळ-जवळ ९१५ मी.मी. पेक्षा जास्त पाउस झाला असल्यामुळे हे धरण आत्ता पुर्ण क्षमतेने भरले आहे.

बुधवार ता.१८ रोजी पहाटे २ वाजता हे धरण ओसंडून वाहण्यास सुरूवात झाली. सध्या या धरणाची पाण्याची पातळी ११६.५ फूटाच्या वरती आहे.अशी माहिती एम्आयडीसी उरण कार्यालयाचे उपअभियंता रविंद्र चौधरी यांनी दिली.

गेल्या वर्षी हे धरण भरण्याला उशिर लागला होता. मात्र या वर्षी हे धरण गेल्या वर्षीच्या तुलनेत ७/८ दिवस लवकर भरले आहे. यावर्षी पावसाळ्याचा जून महिना तसा कोरडा गेल्यामुळे हे धरण अद्याप पर्यंत भरले नव्हते. त्यामुळे एमआयडीसीला हेटवण धरणातून ७ एमएलडी पाणी घ्यावे लागत होते.

रानसई धरणाची उंची १२० फूट जरी असली तरी धरणाची पाण्याची पातळी ११६.६ फूट एवढी झाली की हे धरण ओव्हर फ्लो होते. अर्ध्या अधिक उरण तालुक्याची तहान रानसई धरण भागवते. रानसई धरणातून सध्या उरण नगरपरिषद, २१ गावे आणि एनएडी, ओएनजीसी, जीटीपीएस् या प्रकल्पांना पाणी पुरवठा केला जातो. या वर्षी धरणात पाणी साठा कमी होता. आत्ता धरण भरल्यामुळे उरणच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

"अमेठी आणि रायबरेली दोन्ही माझं कुटूंब..." उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राहुल गांधींची भावनिक पोस्ट

संजय निरूपम यांचा शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतला भगवा

"जाहीर माफी मागा, अन्यथा..."; पॉर्न स्टार म्हटल्यामुळे दुखावलेल्या 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना इशारा

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! पत्नीनं दिलं गुंगीचं औषध, पतीनं केला बलात्कार...; मुंबईत नेमकं काय घडलं?