ठाणे

पीएनपी नाट्यगृह नाट्य रसिकांसाठी पुन्हा सज्ज; स्थानिक कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ

अलिबाग तालुक्यातील सांस्कृतिक केंद्र असणारे पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळ म्हणजेच पीएनपी नाट्यगृह कलाकारांसाठी, नाट्य रसिकांसाठी लवकरचं खुले होणार आहे. पीएनपी नाट्यगृहाला १५ जून २०२२ रोजी भीषण आग लागून दुर्घटना घडली होती.

Swapnil S

धनंजय कवठेकर/अलिबाग

अलिबाग तालुक्यातील सांस्कृतिक केंद्र असणारे पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळ म्हणजेच पीएनपी नाट्यगृह कलाकारांसाठी, नाट्य रसिकांसाठी लवकरचं खुले होणार आहे. पीएनपी नाट्यगृहाला १५ जून २०२२ रोजी भीषण आग लागून दुर्घटना घडली होती. हताश झालेल्या नाट्य रसिकांसाठी पुन्हा एकदा या नाट्यगृहाच्या उभारणीचा संकल्प आमदार जयंत पाटील आणि नाट्यगृहाच्या अध्यक्ष चित्रलेखा पाटील यांनी दुर्घटनेच्या दिवशीच केला होता. दुर्घटनेमुळे पीएनपी नाट्यगृह तीन वर्षे बंद होते.

अनेक नाट्यरसिकांची मोठी निराशा झाली होती. नाट्यगृह पुन्हा उभे करण्यासाठी शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील, संस्थेच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी प्रचंड मेहनत घेतली कलाकारांसाठी अखेर पीएनपी नाट्यगृह पुन्हा उभे राहिले. सोमवारी रोजी शेकाप सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्याच्या दिवशी नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या शुभारंभ होणार आहे. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अलिबागसह जिल्ह्यातील कलाकारांना, नाट्य रसिकांना हक्काचे व्यासपीठ लवकरच खुले होणार आहे.

रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिवंगत प्रभाकर पाटील उर्फ भाऊ यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातही मोलाचे योगदान राहिले आहे.

त्यांची आठवण कायम स्मरणात राहावी, म्हणून पीएनपी नावाचे नाट्यगृह अलिबागच्या प्रवेशद्वारासमोर चेंढरे येथे उभे राहिले. हे नाट्यगृह सहकार तत्त्वावरील महाराष्ट्रातील पहिले नाट्यगृह असून या नाट्यगृहामधून वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात होते. राज्य पातळीवरील वेगवेगळी नाटके याच मंचावर झाली होती. पीएनपी नाट्यगृहाची दुर्घटना अनेकांच्या जिव्हारी लागली होती.

सुसज्ज अशी ७२२ आसन व्यवस्था

वातानुकूलित आधुनिक तंत्रज्ञान, जेबीएल साऊंड सिस्टीमचा वापर करून सुसज्ज असे ७२२ आसन व्यवस्था असणारे, मुबलक पार्किंग व्यवस्था असणारे नाट्यगृह रसिकांसाठी सज्ज झाले आहे. नाट्यगृहाचे दर अन्य - नाट्यगृहांप्रमाणेच सर्वसामान्यांना परवडतील, असे असणार आहेत. स्थानिकांना दरामध्ये विशेष सवलत दिली जाणार आहे. तसेच भविष्यात नाट्यगृहातील अॅड. नाना लिमये रंगमंचावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून स्थानिक कलाकारांना संधी दिली जाणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी दिली.

नूतनीकरणाचा शुभारंभ सोमवारी

शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचा शुभारंभ सोमवारी (दि. ७ जुलै) सकाळी १० वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आजी-माजी मंत्री, विविध पक्षांचे खासदार, आमदार, विविध पक्षांचे रायगडमधील पदाधिकारी तसेच हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत