ठाणे

मीरा-भाईंदरमध्ये येण्यापासून वारिस पठाण यांना रोखले

Swapnil S

भाईंंदर : मीरा-भाईंदरमधील मीरारोड येथे सोमवारी एमआयएम नेते माजी आमदार वारिस हे कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी व पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यासाठी येणार होते. परंतु शहरातील शांतता व कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी व मीरा-भाईंदर पोलिसांनी पठाण यांना शहरात येण्यास विरोध केला. पोलिसांनी पठाण यांना दहिसर चेकनाका येथे अडवून तुम्ही मीरा-भाईंदर शहरात आल्यास कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते. त्यामुळे तुम्ही परत जा, असे सांगितले. त्यावेळी पठाण हे विरोध करत काही वेळ रस्त्यावर बसले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन दहिसर पोलीस ठाणे येथे घेऊन गेले व त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले.

अयोध्या येथे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम झाला. त्यावेळी मीरा-भाईंदर शहरात दोन समाजात तेढ निर्माण झाला होता. ते प्रकरण शांत झाले आहे. त्यानंतर आता शहरात बाहेरून राजकीय नेते येऊन वादग्रस्त विधान केले, तर पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे कोणत्याही बाहेरील नेत्यास शहरात प्रवेश दिला जात नाही. असे असताना वारिस पठाण यांनी मीरा-भाईंदर शहरात येत असल्याने पोलिसांनी ठोस कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पोलिसांनी याची दखल घेत माजी आमदार वारिस पठाण मीरा-भाईंदर शहरात येत असताना सोमवारी दुपारी २ वाजता दहिसर चेकनाक्याजवळ टोलनाका येथे पोलिसांनी थांबवून ताब्यात घेत पुन्हा माघारी पाठवले आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस