ठाणे

बदलापुरात राष्ट्रवादीचे महावितरण विरोधात आंदोलन

वृत्तसंस्था

वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाने वीजपुरवठा होणे आदी समस्यांच्या मुद्द्यावर बदलापुरात राष्ट्रवादीने महावितरण विरोधात आंदोलन केले. यावेळी महावितरण कार्यालयाला कुलूप लावण्याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता. मात्र पोलिसांनी त्यांना यापासून रोखले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता.२१) बदलापूर पश्चिमेकडील सोनिवली येथील महावितरणच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरबाड विधानसभा अध्यक्ष शैलेश वडनेरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड, डॉक्टर सेल जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.अमितकुमार गोईलकर, कामगार सेल जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष सूर्यराव, शहर उपाध्यक्ष दिनेश धुमाळ, महिला विधानसभा अध्यक्ष अनिता पाटील, प्राची थिटे, सोनल मराडे आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी महावितरण कार्यालयाजवळ उपस्थित होते. त्यांनी आंदोलकांना महावितरण कार्यालयाच्या गेटवरच अडवून धरले होते. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.

महाराष्ट्रातील राजकारण भरकटत आहे!

नद्या आ वासताहेत...

काँग्रेसला मोठा धक्का! अरविंदर सिंग लवली यांचा दिल्लीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; 'आप'सोबत युती केल्यामुळे नाराज

सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणाच्या मुद्यावरून स्पष्टीकरण; "जोपर्यंत आरक्षणाची गरज..."

उज्ज्वल निकम यांना जळगावातून उमेदवारी द्यायला हवी होती - संजय राऊत