ठाणे

उल्हासनगरमध्ये ‘क्रीडा क्रांती’ होणार; शालेय खेळाडूंना मिळणार जागतिक दर्जाच्या सुविधा

उल्हासनगर महानगरपालिका क्रीडा विभागाने शहरातील क्रीडा संस्कृतीला बळकटी देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. दि. २ डिसेंबर रोजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक विकास ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत, शालेय खेळाडू आणि नागरिकांसाठी दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Swapnil S

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिका क्रीडा विभागाने शहरातील क्रीडा संस्कृतीला बळकटी देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. दि. २ डिसेंबर रोजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक विकास ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत, शालेय खेळाडू आणि नागरिकांसाठी दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक आणि समिती सदस्यांच्या सहभागाने पार पडलेल्या या चर्चासत्रात शहरातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वाच्या योजना मांडण्यात आल्या.

उल्हासनगर शहरातील शालेय खेळाडूंना आणि नागरिकांना उत्कृष्ट क्रीडा सुविधा मिळाव्यात यासाठी पालिकेने ठोस पावले उचलली आहेत. टेबल टेनिस कोर्ट, कॅरम, बुद्धिबळ, बॅडमिंटन कोर्ट, रायफल शूटिंग रेंज, खो-खो आणि कबड्डी यांसारख्या क्रीडा सुविधांची उभारणी करण्यासाठी आयुक्तांनी तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. "उल्हासनगर शहरातील प्रत्येक खेळाडूसाठी दर्जेदार क्रीडा सुविधा निर्माण करणे हा आमचा प्राधान्यक्रम आहे, असे आयुक्त विकास ढाकणे यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. या बैठकीत शहरातील क्रीडा मैदानांची उपलब्धता, व्यवस्थापन, क्रीडा साहित्याची कमतरता, तसेच खेळाडूंच्या प्रगतीसाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. क्रीडा शिक्षकांनी त्यांच्या समस्या मांडल्या, तर प्रशिक्षकांनी खेळाडूंना भेडसावणाऱ्या अडचणींची माहिती दिली

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपआयुक्त विशाखा मोटघरे, नगररचनाकार ललीत खोब्रागडे, मुख्य लेखा अधिकारी किरण भिल्लारे, महापालिका सचिव प्राजक्ता कुलकर्णी, कर निर्धारक आणि संकलन अधिकारी निलम कदम, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, गणेश शिंपी, यशवंत सगळे, शांताराम चौधरी यांच्यासह क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, क्रीडा समिती सदस्य आणि समाजसेवक उपस्थित होते. महानगरपालिकेच्या या पुढाकारामुळे उल्हासनगर शहरातील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे. या योजनेमुळे स्थानिक खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण मिळणार असून, शहराचा क्रीडा क्षेत्रात नावलौकिक वाढण्यास मदत होईल. उल्हासनगर महानगरपालिकेने घेतलेल्या या सकारात्मक निर्णयांमुळे स्थानिक क्रीडा क्षेत्रासाठी एक नवा अध्याय सुरू होत आहे.

उल्हासनगरमधील शालेय खेळाडू आणि नागरिकांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. शहरातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही लवकरच टेबल टेनिस कोर्ट, रायफल शूटिंग रेंज, कबड्डी व खो-खो यांसारख्या सुविधा निर्माण करू. खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे.

- विकास ढाकणे, (आयुक्त, उल्हासनगर महानगरपालिका)

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास