ठाणे

Stone pelting on AC local: ठाकुर्ली-डोंबिवलीदरम्यान एसी लोकलवर दगडफेक; मद्यधुंद आरोपी पोलिसांच्या ताब्यात

नवशक्ती Web Desk

मुंबई एसी लोकलवर पुन्हा एकादा दगडफेकीची घटना घडली आहे. ठाकुर्ली-डोंबीवली स्थानकादरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एसी लोकलवर एका माथेफिरुकडून दगडफेक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शरद गा गांगुर्डेला अटक केली आहे. आरोपीने मद्यधुंद अवस्थेत दगडफेक केल्याचं समोर आलं आहे. यापूर्वी देखील ट्रेनवर दगडफेक केल्याच्या घटना घडल्या आहेत.

सकाळी ९.२० ला ठाकुर्ली ते डोंबिवली स्थानकादरम्यान ही घटना घडली. डोंबिवली आरपीएप टीमने या घटनेबद्दल माहिती दिली. या दगडफेकीत एसी लोकलच्या खिडकीची काच फुटली असून खिडकीच्या बाजूला बसेलेली महिला किरकोळ जखमी झाली. आरोपीबद्दल ट्रेनमधील प्रवाशांनी आरपीएफला माहिती दिल्यानंतर सहाय्यक निरीक्षक रंजन शिंदे आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहचली.

आरपीएफला शरद हा रुळाजवळ दिसून आला. आरपीएफला पाहताच त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेली पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतलं. आरोपी हा दादरमधील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. दारुच्या नशेत सकाळी ९ वाजण्याच्या सुमारात डोंबिवली ते ठाकुर्ली रेल्वेरुळावरुन सीएसएमटीकडे जातक होता. लोकलचा हॉर्न वाजल्यानंतर त्याने दगड उचलला आणि ट्रेनवर फेकण्यास सुरुवात केली. आरोला रेल्वे कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल