ठाणे

तळोजा मेट्रो १२ मार्गाच्या कामाला गती देण्याची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची मागणी

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई आणि उपनगरात विविध मेट्रो मार्गांची उभारणी केली जाते

प्रतिनिधी

तळोजा या मेट्रो १२ मार्गाच्या कामाला गती देण्याची आग्रही मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. ठाणे - भिवंडी - कल्याण या मेट्रो मार्गाचा हा विस्तारित मार्ग असून यामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीणचा भाग आणि तळोजा हे एकमेकांना थेट जोडले जातील. त्याचा नागरी वस्तीसह ग्रामीण भागालाही फायदा होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई आणि उपनगरात विविध मेट्रो मार्गांची उभारणी केली जाते आहे. या मार्गांमुळे प्रवास सुखकर झाला आहे. तर विविध मार्गांवर येत्या काळात प्रवास सोयीचा आणि जलद होणार आहे. ठाणे-भिवंडी- कल्याण या मेट्रो मार्गाचा विस्तारीत भाग असलेल्या कल्याण-डोंबिवली- तळोजा ( मेट्रो १२) या मार्गालाही मंजुरी देण्यात आली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे मेट्रोसाठी आग्रही आहेत. या मेट्रो मार्गामुळे ठाणे शहरातला प्रवासी भिवंडी ते कल्याण आणि कल्याण येथील प्रवासी थेट तळोजा आणि नवी मुंबईला जोडला जाणार आहे. त्यामुळे या मार्गाच्या उभारणीला महत्व प्राप्त झाले आहे. या एकूण २०.७५ किलोमीटरच्या मार्गात १७ स्थानक नियोजित करण्यात आले आहेत.

मुंबईत कोसळधार! पुढील काही तास धोक्याचे, ‘रेड अलर्ट’ जारी

मराठवाड्यात पावसाचा कहर; धाराशिव-छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरस्थिती तीव्र, जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले

करूर चेंगराचेंगरी : मृतांची संख्या ३९ वर; विजय थलापतींकडून २० लाखांची मदत जाहीर, तपास समिती नियुक्तीचे आदेश

ठाण्यात पावसाचा जोर कायम; सखल भागांत पाणी साचले, नवरात्र आणि गरब्यावर पावसाचे सावट

Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा पुरसंकट; बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत