ठाणे

बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षकांचा बहिष्कार

Swapnil S

वसई : बारावीच्या परीक्षेला राज्यात बुधवारपासून सुरुवात झाली आहे, परंतु बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामावर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांनी बहिष्कार टाकला आहे. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या वारंवार आंदोलन करूनही मान्य झालेल्या नाहीत, त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलन केले जात आहे. पालघर जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक देखील यात सामील झालेले आहेत.

कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी,तसेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १०,२०,३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना त्वरित लागू करावी, आयटी विषय शिक्षकांना वेतनश्रेणी द्यावी. अघोषित उच्च माध्यमिकला अनुदानासह घोषित करून अंशतः अनुदानावरील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना प्रचलित अनुदान सूत्र तातडीने लागू करावे, शिक्षकांची सर्व रिक्त पदे त्वरित भरावीत यासह इतर मागण्या गेल्या काही वर्षांपासून शासन पातळीवर प्रलंबित आहेत. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने या मागण्यांसाठी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामध्ये पालघर जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक देखील सामील झालेले आहेत.

सरकारकडून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत नियामकानी त्यांच्या बैठकीला उपस्थित राहू नये व सर्व शिक्षकांनी उत्तर तपासणी बहिष्कार आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन आवाहन अध्यक्ष प्रा. सुनील पूर्णपात्रे, सेक्रेटरी प्रा. विलास खोपकर, सह सेक्रेटरी प्रा. महेंद्र घरत, कार्याध्यक्ष प्रा. सुनील बैसाणे, उपाध्यक्ष प्रा. रजसिंग कोळी, प्रा. हरीश वळवी, खजिनदार प्रा.सुभाष शिंदे आणि इतर पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे आवाहन केले आहे.

पेपर झाल्यावर मुख्य नियामकांची बैठक होते. परंतु बहिष्कार आंदोलनामुळे ही बैठक झालेली नाही. दरम्यान परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीसाठी संबंधित केंद्रावर रवाना केल्या जातील, मात्र बहिष्कार आंदोलनामुळे परीक्षक त्या स्वीकारणार नाहीत. उत्तरपत्रिका मुख्याध्यापकांच्या कस्टडीतच राहतील.

-प्रा. विलास खोपकर, सेक्रेटरी पालघर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना

राज्य सरकारच्या धर्तीवर ‘ड्युटी पॅटर्न’ राबवा; परिचारिकांच्या शेकडो रिक्त पदांमुळे कामाचा ताण

मोदींनंतर अमित शहा पंतप्रधान! मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दावा

ज्योतिषानं काढली भाजप-काँग्रेसची कुंडली अन् थेट सांगितला लोकसभेचा निकाल; नेटकरी घेतायेत मजा

Mumbai: नाश्ता बनवला नाही म्हणून पतीने पत्नीवर केले हातोड्याने वार, कुर्ला येथील घटना

भुयारी मेट्रोची दादर स्थानकापर्यंत चाचणी; पहिल्या टप्यातील मेट्रो धावण्याची तारीख लवकरच जाहीर होणार