संग्रहित छायाचित्र पीटीआय
ठाणे

ठाणे-भिवंडी-कल्याणला जोडणाऱ्या Metro 5 च्या बांधकामाचा वेग वाढणार; कशेळी कारशेडचा मार्ग अखेर मोकळा होणार!

मुंबई मेट्रोच्या सर्वात प्रलंबित आणि महत्त्वाच्या मार्गापैकी एक व ठाणे पलीकडील भिवंडी आणि कल्याणला जोडणाऱ्या ऑरेंज लाईन मेट्रो ५ च्या बांधकामाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने रखडगाडी ठरलेल्या या प्रकल्पाचे बांधकाम आता वेग पकडणार आहे.

Swapnil S

मुंबई मेट्रोच्या सर्वात प्रलंबित आणि महत्त्वाच्या मार्गापैकी एक व ठाणे पलीकडील भिवंडी आणि कल्याणला जोडणाऱ्या ऑरेंज लाईन मेट्रो ५ च्या बांधकामाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने रखडगाडी ठरलेल्या या प्रकल्पाचे बांधकाम आता वेग पकडणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ या मार्गिकेतील कशेळी कारशेडच्या बांधकामाचा मार्ग अखेर मोकळा होणार आहे. या कारशेडसाठीच्या २७.१३ हेक्टर जागेच्या ताब्याबाबत बाधितांचे अडथळे अखेर दूर झाले आहेत. ऑरेंज लाईन ५ हा मेट्रो प्रकल्प ठाणे पल्याड असणाऱ्या भिवंडी आणि कल्याणला ठाणे शहराशी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. २४.९० किमी लांबी असणारा आणि १५ मेट्रो स्थानके असणारा हा प्रकल्प भिवंडी आणि परिसराचा चेहरामोहरा बदलणारा गेमचेंजर प्रकल्प आहे.

या मार्गिकेला महाराष्ट्र मंत्रिमंडळाने २४ ऑक्टोबर २०१७ रोजी मान्यता दिली होती; मात्र प्रकल्पाच्या घोषणेपासूनच मेट्रो प्रकल्प वादाच्या भोवर्यात अडकला होता. या प्रकल्पावरून भिवंडीत राजकारण करण्यात आल्याने या प्रकल्पाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. मेट्रो मार्गात येणाऱ्या काही नागरिकांची घरे विस्थापित करण्यावरून बराच वाद निर्माण झाल्याने अनेक दिवस प्रकल्पाचे काम रखडले होते.

‘एमएमआरडीए’कडून २४.९० किलोमीटर लांबीच्या ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ मार्गिकेचे काम सूरू करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ८४१६ कोटी रुपये खर्च करत ही मार्गिका उभारली जात असून दोन टप्प्यांमध्ये या मार्गिकेचे काम केले जात आहे. लवकरच येथील कशेळी येथे कारशेड बांधण्याचा कामाला प्रारंभ होणार आहे.

एमएमआरडीए डिसेंबर २०१७ पर्यंत या मार्गाचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले होते, भिवंडीतील काही दुकानदार आणि रहिवाशांच्या निषेधामुळे सर्वेक्षण कामात अडथळा निर्माण झाला होता. हा प्रकल्प पूर्ण झाल्या नंतर ठाणे ते भिवंडी दरम्यान वाहतुकीचे नवीन आणि पर्यावरणपूरक साधन निर्माण होणार असून, सार्वजनिक वाहतुकीवर पडणारा ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे.

मुंबई शहरातील जलद परिवहन व्यवस्था मालकी हक्क मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे आहे. या कारशेडच्या २७.१३ हेक्टर जागेच्या ताब्यात येणार होती; त्याची प्रतीक्षा एमएमआरडीएला गेल्या काही महिन्यांपासून होती. आता मात्र ती संपुष्टात आली आहे. ही मार्गिका पूर्णपणे उन्नत असेल ती ठाणे पूर्व उपनगरातील भिवंडी आणि कल्याणला जोडेल. ठाणे पश्चिम, बाळकुम नाका, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजुर फाटा, धामणकर नाका, भिवंडी, गोपाळनगर, टेमघर राजनौली गाव, गोवेगाव, एमआयडीसी, कोनगाव, दुर्गाडी किल्ला, सहानंद चौक, कल्याण रेल्वे स्थानकांमध्ये या स्थानकांमध्ये कापूरबावडीचाही समावेश आहे.

कशेळीतील जागेचा ताबा ‘एमएमआरडीए’ला मिळणार

येत्या काही दिवसांमध्ये कशेळीतील २७.१३ हेक्टरपैकी २५ हेक्टर जागेचा ताबा ‘एमएमआरडीए’ला मिळणार आहे. त्यामुळे आता लवकरच कशेळी कारशेडच्या कामाला सुरुवात होणार आहे. या मार्गिकेवर १५ स्थानके आहेत. त्यापैकी अंजुरफाटा, कल्याण रेल्वे स्थानक या स्थानकांची कामे मध्य रेल्वे आणि अंजुर फाटा व भारतीय रेल्वे करणार आहे. यासह कल्याण एपीएमसी स्थानक ही मार्गिका बारा (मुंबई मेट्रो) करणार आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी अनुपस्थित शिक्षकांना दिलासा; ३ नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण घेता येणार

एसटी प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत मोठे पाऊल; सहा आठवड्यांत चौकशी पूर्ण करत अहवाल सादर करणे बंधनकारक

जळगाववरून आता दररोज विमानसेवा सुरू; जळगाव-मुंबई आणि जळगाव-अहमदाबाद प्रवासी सेवा

कल्याणमध्ये उद्या पाणीपुरवठा ठप्प