Thane : व्यावसायिक सिलिंडर दरवाढीमुळे उद्योग संकटात; खानावळी, छोटे स्टॉलधारक, पोळीभाजी केंद्रांचे गणित बिघडले 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
ठाणे

Thane : व्यावसायिक सिलिंडर दरवाढीमुळे उद्योग संकटात; खानावळी, छोटे स्टॉलधारक, पोळीभाजी केंद्रांचे गणित बिघडले

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे ठाण्यातील हॉटेल, उपाहारगृहे आणि पोळीभाजी केंद्र चालकांसमोर गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

Swapnil S

ठाणे : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे ठाण्यातील हॉटेल, उपाहारगृहे आणि पोळीभाजी केंद्र चालकांसमोर गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे. केवळ एका दिवसात सिलिंडरचा दर २,३०० रुपयांवरून थेट ३,७०० रुपयांपर्यंत पोहोचल्याने खर्चाचा ताळमेळ बसवणे कठीण झाले आहे. परिणामी, छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडण्याची भीती व्यक्त होत आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः अखाती देशांमधील तणावामुळे काही काळ व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाला होता. त्या काळात अनेक हॉटेलचालकांना पर्याय म्हणून चुलींचा वापर करावा लागला, तर काहींनी व्यवसाय तात्पुरता बंद ठेवला. आता परिस्थिती काही प्रमाणात सुधारली असली तरी व्यावसायिक गॅसवरील निर्बंध आणि दरवाढ यामुळे अडचणी कायम आहेत. दरम्यान, घरगुती गॅस पुरवठा पूर्ववत होत असल्याचे चित्र दिसत आहे. पूर्वी ३० ते ३५ दिवसांपर्यंत वाढलेला बुकिंग कालावधी आता ३ ते ४ दिवसांवर आला असून वेटिंग लिस्टमध्येही मोठी घट झाली आहे. मात्र, व्यावसायिक सिलिंडरच्या बाबतीत ताण कायम असल्याने व्यावसायिकांना त्याचा थेट फटका बसत आहे.

या दरवाढीचा सर्वाधिक परिणाम लहान-मोठ्या खानावळींवर झाला आहे. वाढत्या कच्च्या मालाच्या किमती, वीजबिल, भाडे आणि मजुरी यामुळे आधीच अडचणीत असलेल्या व्यावसायिकांना आता गॅस खर्चात झालेल्या वाढीचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेकांनी खाद्यपदार्थांच्या दरात वाढ करण्याचा पर्याय विचारात घेतला आहे. एकंदरीत, व्यावसायिक गॅस सिलिंडर दरवाढीमुळे ठाण्यातील खाद्यव्यवसायावर मोठे संकट ओढवले असून, त्याचा परिणाम थेट ग्राहकांच्या खिशावरही होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

खवय्यांच्या खिशालाही बसणार चटका

गॅस दरवाढीचा परिणाम आता ग्राहकांवरही होणार आहे. खाऊगल्ली, रेस्टॉरंट्स आणि पोळीभाजी केंद्रांमध्ये मिळणाऱ्या पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चात भर पडणार आहे. व्यावसायिकांच्या मते, गॅस सिलिंडरचे दर एवढ्या झपाट्याने वाढत राहिल्यास व्यवसाय चालवणे कठीण होईल. प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढणे आवश्यक आहे.

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी