ठाणे

Thane : ‘धर्मवीर आनंद दिघे’ कल्याणकारी मंडळाची स्थापना; ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सीचालकांना मोठा दिलासा

महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सीचालकांच्या जीवनात स्थैर्य, सुरक्षितता आणि कल्याणकारी उपाययोजना आणण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ‘महाराष्ट्र ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळ’ चे मुख्य कार्यालय प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे येथे सुरू करण्यात आले आहे.

Swapnil S

ठाणे : महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सीचालकांच्या जीवनात स्थैर्य, सुरक्षितता आणि कल्याणकारी उपाययोजना आणण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ‘महाराष्ट्र ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळ’ चे मुख्य कार्यालय प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे येथे सुरू करण्यात आले आहे.

हा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या १० सप्टेंबर रोजी झालेल्या महत्वाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे रिक्षा व टॅक्सीचालकांसाठी केवळ कल्याणकारी योजना नव्हे, तर शासकीय छत्राखाली एक विश्वासार्ह व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. मंडळाच्या माध्यमातून आता सर्व चालकांना घरबसल्या ऑनलाइन सभासद नोंदणी करता येणार आहे. अधिकृत संकेतस्थळावर https://ananddighekalyankarimandal.org वाहन व परवाना क्रमांक, कुटुंबाची माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करता येतात. अर्जाची छाननी झाल्यानंतर सभासद शुल्क रु. ८०० ऑनलाइन भरून अंतिम पावती मिळवता येणार आहे. क्यू आर कोडद्वारे फोन पे किंवा गुगल पे वापरून सुरक्षित पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने स्थापन झालेले हे मंडळ चालकांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक हितासाठी उभारलेले मजबूत व्यासपीठ ठरणार असून, यामध्ये सहभागी होणे ही सर्व चालकांसाठी सुवर्णसंधी आहे.
हेमांगिनी पाटील, अधिकारी प्रादेशिक परिवहन

ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, वेगवान आणि त्रुटीरहित ठेवण्यात आली असून, चुकीची माहिती भरल्यास ‘Edit Details’ बटणाद्वारे दुरुस्तीची सुविधा देखील आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे कामकाज सुरू असून, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी चालकांना फक्त अधिकृत वेबसाईटवरच विश्वास ठेवण्याची आणि बनावट लिंकपासून दूर राहण्याची सूचना केली आहे.

कोठडीमुळे कामावर गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्याला पगार नाही

बस्तर सफरीवर निघालेल्या मुंबईच्या २४ वर्षीय बायकरचा अपघातात मृत्यू; १५ तासांपूर्वी केली होती 'लेट्स एक्सप्लोर बस्तर' पोस्ट

मुंबईतील स्विमिंग पुलांना पुन्हा पाणीपुरवठा; सातही धरणातील पाणीसाठा योग्य

सिद्धिविनायक मंदिर परिसराला नवी झळाळी; ७८ कोटी खर्च; भूमिगत पार्किंग, भिंतींचे स्टोन क्लॅडिंग; कामाचा १५ ऑगस्टपासून शुभारंभ

सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणणार; महसूलमंत्र्यांचे आदेश; कर्जमाफी, शासकीय योजनांचा मिळणार लाभ