ठाणे

ठाणे : आनंद आश्रमात चक्क उडवल्या नोटा; सोशल मीडियावर Video व्हायरल

धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात चक्क नोटा उडवल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Swapnil S

ठाणे : धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात चक्क नोटा उडवल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर विरोधकांकडून टीका होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी ढोल, ताशांच्या तालावर नाच करीत असल्याचे दिसत आहे. तर काही जण स्वर्गीय आनंद दिघे यांच्या फोटोभोवती नोटा फिरवून त्या उधळत असल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे. यापूर्वी विजयाचा आनंद झाला तर आनंदाश्रमाच्या बाहेर जल्लोष होत असे. गुलालाची उधळण देखील केली जायची. पण ऐन गणेशोत्सवाच्या काळात अशाप्रकारे आनंदाश्रमाच्या आतच ढोल-ताशे घुसवून नाच करण्याचा प्रकार घडल्याने शिंदे यांच्या शिवसेनेवर टीकेचा भडीमार होत आहे.

केवळ ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आदराचे स्थान असलेल्या आनंदाश्रमात तुम्ही नोटा उधळल्या. हा प्रकार अतिशय संतापजनक असून दिघेंच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले आहे. आमचा आनंद हरपला असून त्यांच्याबद्दल असलेले प्रेम किती खोटे आहे हेच यातून सिद्ध होत आहे. - केदार दिघे, ठाणे जिल्हाप्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी