ठाण्यात लॉजिस्टिक्स पार्क उभारणार? केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे संकेत 
ठाणे

ठाण्यात लॉजिस्टिक्स पार्क उभारणार? केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे संकेत

देशांतर्गत उत्पादनांची पुरवठा साखळी सुलभ करण्यासाठी औद्योगिक भागांजवळ लॉजिस्टिक्स पार्क विकसित होत असताना, ठाणे जिल्ह्याचा यात समावेश आहे का, असा सवाल खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केला. त्यांच्या पीपीपी तत्त्वावर पार्क उभारण्याच्या सूचनेचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी स्वागत करत भविष्यात ठाणे जिल्ह्यात लॉजिस्टिक्स पार्क उभारण्याचे संकेत दिले.

Swapnil S

ठाणे : देशात उत्पादन केलेल्या वस्तूंची पुरवठा साखळी सुलभ करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रांजवळ आधुनिक लॉजिस्टिक्स पार्क विकसित केले जात असून ठाणे जिल्ह्याचा यात समावेश आहे का? असा थेट सवाल खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत उपस्थित केला. हे पार्क पीपीपी तत्त्वावर विकसित करावे, या खासदार नरेश म्हस्के यांच्या सूचनेचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी स्वागत केले आणि भविष्यात ठाणे जिल्ह्यात लॉजिस्टिक्स पार्क उभारण्याचे संकेतही दिले.

ठाणे जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्र असून लघु, मध्यम आणि मोठे उद्योग कार्यरत आहेत.

पण, सुसज्ज लॉजिस्टिक्स सुविधांचा अभाव असल्यामुळे उद्योगांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे ठाण्यासारख्या औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात लॉजिस्टिक्स पार्क उभारल्यास उद्योगांना मोठा फायदा होईल, रोजगारनिर्मिती वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे खासदार म्हस्के यांनी सभागृहात नमूद केले.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके