ठाणे

Thane : ठाण्यात ‘वाळवी’च्या टीमने दिले रोड सेफ्टीचे धडे

परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ चित्रपटाला समीक्षकांसहित प्रेक्षकांचीही पसंती मिळत आहे (Thane)

प्रतिनिधी

सध्या महाराष्ट्रभर ‘वाळवी’ लागली असून प्रेक्षकांकडूनही या ‘वाळवी’ला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ चित्रपटाला समीक्षकांनीही पसंती दर्शवली आहे. त्यामुळे सध्या ‘वाळवी’चाच बोलबाला आहे. नुकतेच ‘वाळवी’च्या टीमने ठाण्यात (Thane) आयोजित झालेल्या ३३ व्या रोड सेफ्टी वीकमध्ये हजेरी लावली. या वेळी स्पप्नील जोशी, अनिता दाते, शिवानी सुर्वे यांनी बाईक रॅलीचे उद्घाटन केले.

'वाळवी' या चित्रपटाची भुरळ सिनेसष्टीलाही पडली आहे. अनेक कलाकारांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. ‘वाळवी’ची खासियतही काही कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. एकंदरच लाकूड पोखरणारी ही ‘वाळवी’ सगळ्यांची मने जिंकत आहे. नुकतेच ‘वाळवी’ हा रहस्यपट सर्वत्र प्रदर्शित झाला असून झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी निर्मित या चित्रपटात सुबोध भावे, स्वप्नील जोशी, अनिता दाते, शिवानी सुर्वे, नम्रता संभेराव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी लिखित ‘वाळवी’ हा मराठीतील पहिली थ्रिलकॅाम चित्रपट आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत