ठाणे

नवरात्रौत्सवानिमित्ताने बाजार सजले; दांडिया, गरब्यासाठी धोती-कुर्ता, घागरा-चोली भाड्याने घेण्याचा ट्रेंड!

गुरुवारपासून नवरात्रौत्सव सुरू होणार असून गरबा, दांडियाचे सूर सगळीकडे धुमणार आहेत मात्र त्याची तयारीला आतापासूनच सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.

Swapnil S

ठाणे : गुरुवारपासून नवरात्रौत्सव सुरू होणार असून गरबा, दांडियाचे सूर सगळीकडे धुमणार आहेत मात्र त्याची तयारीला आतापासूनच सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. या उत्सवात घागरा चोली, धोती-कुर्ता, केडिया या पारंपरिक ट्रेडिशनल कपड्यांची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सण-उत्सवामध्ये पारंपरिक कपडे भाड्याने घेण्याचा हा अनेक वर्षांचा ट्रेंड यंदाही कायम आहे. आजही उत्सव आणि विविध कार्यक्रमांनिमित्त पारंपरिक कपडे भाड्याने घेतले जातात.

नवरात्रौत्सवाच्या नऊ दिवसांत नऊ पद्धतीचे पोशाख खरेदी करणे प्रत्येकास शक्य नसते. यास पर्याय म्हणून अनेकजण पारंपरिक कपडे भाड्याने घेऊन दांडिया खेळण्याचा आनंद लुटतात. त्यात मोठ्या प्रमाणात महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा यात सहभाग असतो. नवरात्राैत्सवानिमित्त केडिया, धोती-कुर्ता, घागरा-चोली या पारंपरिक कपड्यांना भाडेतत्त्वावर घेण्याची मागणी वाढलेली आहे. ठाण्यात नामदेववाडी हॉलसमोर आणि चेंदणी कोळीवाड्यात माझे ग्रंथ भांडारच्या बाजूला रिद्धी सिद्धी ड्रेसवाला यांच्याकडे भाड्याने ट्रेडिशनल कपडे उपलब्ध आहेत. उत्सवाच्या अगोदर बुकिंग केले जात असून आवडीनुसार फिटिंग तसेच त्याला साजेशे दागिने बुक केले जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

तरुणांची अधिक पसंती

वर्षात एक-दोन वेळा वापर होत असल्याने हे पारंपरिक कपडे अनेकजण खरेदी करत नाहीत. तसेच प्रत्येक वर्षी नवाकोरा ड्रेस घेणेही परवडत नाही. त्यामुळे नवरात्रौत्सवात खास मारवाड, गुजराती पेहराव्याला मागणी असते. स्पर्धेत पारंपरिक पोषाखात सहभागी होण्याचे निमंत्रण असते. विजेत्यांना भरघोस बक्षिसे दिली जात असल्याने कपडे भाड्याने घेतात. तरुणाईकडून जास्त मागणी असते.

पोशाखाचे भाडे

-घागरा-चोली ५०० ते ६००

-केडिया सूट ४०० ते ५००

-इंडो वेस्टर्न ४५०ते ६०००

-धोती सूट ४०० ते ५००

-लहान मुलांचे पोशाख ३०० ते ५००

पोलादपूरमध्ये नवरात्रौत्सव सोहळ्याचे आयोजन

पोलादपूर : रायगड व सातारा सीमावर्ती भागातील पार्वतीपूर म्हणजेच पारसोंड-पार येथील श्रीरामवरदायिनी मंदिरामध्ये येत्या ३ ऑक्टोबर रोजी सकाळी देवीच्या मूर्तीस जलाभिषेकानंतर सकाळी देवीच्या घटस्थापनेसोबत नवरात्रौत्सव सुरू होणार असल्याची माहिती श्रीरामवरदायिनी देवस्थान ट्रस्ट, पारसोंड पारतर्फे देण्यात आली. अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापनेने या सोहळ्याची सुरुवात होणार असून प्रतिपदेच्या दिवशी आदिशक्ती आणि विविध देवदेवतांचा अभिषेक, पारंपरिक आभूषणे आणि वेशभूषेने आरतीसह नवरात्राैत्सवाची सुरुवात होणार आहे. ललिता पंचमीचा कुंकुमार्चन, अष्टमीला घातला जाणारा आई श्रीरामवरदायिनी देवीचा गोंधळ तसेच दैनंदिन सहस्त्रनाम पठण असे धार्मिक कार्यक्रम या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी