ठाणे

ठाण्यात ३२ प्रभागांत चार, तर एका प्रभागात तीनवेळा मतदान; सर्व जागांवर मतदान केल्यावरच प्रक्रिया पूर्ण होणार - आयुक्त सौरभ राव

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी ठाणे महापालिका क्षेत्राचे एकूण ३३ प्रभागांमध्ये विभाजन करण्यात आले असून १३१ नगरसेवकांच्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे. प्रभाग क्रमांक १ ते २८ आणि ३० ते ३३ या ३२ प्रभागांमध्ये प्रत्येकी चार जागांसाठी मतदान होणार असून प्रभाग क्रमांक २९ मध्ये तीन जागांसाठी मतदान होणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली.

Swapnil S

ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी ठाणे महापालिका क्षेत्राचे एकूण ३३ प्रभागांमध्ये विभाजन करण्यात आले असून १३१ नगरसेवकांच्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे. प्रभाग क्रमांक १ ते २८ आणि ३० ते ३३ या ३२ प्रभागांमध्ये प्रत्येकी चार जागांसाठी मतदान होणार असून प्रभाग क्रमांक २९ मध्ये तीन जागांसाठी मतदान होणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली. ही निवडणूक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (EVM) सहाय्याने घेण्यात येणार असून, संबंधित प्रभागानुसार बॅलेट युनिटवर तीन किंवा चार मतपत्रिका उपलब्ध असणार आहेत.

प्रत्येक मतदाराला वरीलप्रमाणे सर्व जागांसाठी मतदान करणे बंधनकारक असणार आहे. म्हणजेच ३२ प्रभागांमध्ये चार मते, तर प्रभाग क्रमांक २९ मध्ये तीन मते नोंदविल्याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही. प्रत्येक जागेसाठी उमेदवारांसोबतच ‘नोटा’ (NOTA - वरीलपैकी एकही नाही) हा पर्यायही मतदारांना उपलब्ध असणार आहे. मतदारांनी सर्व जागांसाठी मतदान पूर्ण केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातून शिट्टीचा आवाज येईल आणि यंत्रावरील दिवे बंद होतील. त्यानंतर मतदान यंत्र पुढील मतदारासाठी पुन्हा उपलब्ध होईल.

लोकशाही अधिक बळकट करण्याचे आवाहन

एखाद्या मतदाराने चारपैकी (किंवा प्रभाग क्र. २९ साठी तीनपैकी) एक किंवा दोन अथवा तीनच मते नोंदवून मतदान कक्षाबाहेर जाण्याचा प्रयत्न केल्यास, संबंधित मतदान अधिकाऱ्यांकडून त्या मतदारास पुन्हा मतदान कक्षात पाठवून उर्वरित मतदान प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना करण्यात येईल. सर्व जागांसाठी मतदान केल्याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण मानली जाणार नाही. मतदारांनी निर्भयपणे, जागरूकतेने आणि पूर्ण मतदान करून लोकशाही अधिक बळकट करावी, असे आवाहन राज्य निवडणूक आयोग तसेच महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी केले आहे.

मुंबईसह राज्यातील २६-२७ मनपा आम्ही जिंकू! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दृढ विश्वास

BMC Election : बेस्ट, एसटीलाही लागली इलेक्शन ड्युटी; प्रवासी सेवेवर गंभीर परिणाम होणार

'जलद डिलिव्हरी' आता होणार आरामात; झेप्टो, ब्लिंकिट, स्विगीबाबत केंद्र सरकारचा निर्णय

भटका कुत्रा चावल्यास नुकसानभरपाई द्यावी लागेल; सुप्रीम कोर्टाचा सरकारला इशारा

बिनविरोध उमेदवारांबाबत आज सुनावणी; मनसेकडून कोर्टात याचिका