वृद्धांना मतदान केंद्रावर जाऊन करावे लागणार मतदान Photo : Getty Images
ठाणे

Thane : वृद्धांना मतदान केंद्रावर जाऊन करावे लागणार मतदान

ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या १५ जानेवारी रोजी होणार आहे. यादिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना केंद्रावर जाऊन मतदान करावे लागणार आहे. त्यांच्यासाठी तळ मजल्यावर व्यवस्था करण्यात आली असून व्हिलचेअर उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

Swapnil S

ठाणे : ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या १५ जानेवारी रोजी होणार आहे. यादिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना केंद्रावर जाऊन मतदान करावे लागणार आहे. त्यांच्यासाठी तळ मजल्यावर व्यवस्था करण्यात आली असून व्हिलचेअर उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी महापालिकेची निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यानुसार आवश्यक असलेले मनुष्यबळ सज्ज करण्यात आले आहे. ठाण्यात ४ लाख नव्या मतदारांची वाढ झाली आहे. त्यानुसार १६ लाख ४९ हजार ८६७ मतदारांची संख्या झाली आहे. यात पुरुष मतदारांची संख्या ८६३८७८ एवढी असून स्त्री मतदारांची संख्या ७८५८३० एवढी आहे. दरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आजारी, वृध्द नागरिकांसाठी घरी जाऊन मतदान करुन घेतले जात होते. त्यामुळे महापालिका निवडणुकीत ही सुविधा मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे लागणार आहे.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून अशा वृध्द मतदारांसाठी तळ मजल्यावर व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेबरोबरच त्याठिकाणी मतदानासाठी प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. याशिवाय मतदान केंद्रांच्या ठिकाणी व्हिलचेअरची सुविधा देखील पुरविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

सौर कृषिपंपांमध्ये राज्याचा विक्रम; देशातील एकूण सौर पंपांमध्ये महाराष्ट्राचा वाटा ६४ टक्के

Thane : पालकांनी मुदतीत प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन; RTE प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी ४ ते १२ जूनदरम्यान

ऑफिसमध्ये २५-३० वार करत एक्स गर्लफ्रेंडची हत्या; आरोपीने स्वतःच्या गळ्यावरही फिरवला चाकू, धक्कादायक VIDEO व्हायरल

मुंबईतील विहिरींना पावसाची ओढ; एक हजार विहिरींची युद्धपातळीवर साफसफाई, पिण्याव्यतिरिक्त वापरासाठी उपलब्ध करणार

मुंबईला मिळणार पहिला ‘पादचारी झोन’; काळा घोडा परिसर पर्यटकांचे ठरणार आकर्षण