ठाणे

ठाणे, नवी मुंबईत पावसाचा कहर; मुसळधार पावसाने नवी मुंबईला झोडपले

जून महिन्यात साधारणतः बरसणाऱ्या मान्सून अगोदरच यंदा मे महिन्यात अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्यात सर्वच प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. त्यातच २५ मे रोजी रात्रीपासून नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पनवेल, कोकण किनारपट्टीसह राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस चांगलाच बरसू लागला आहे. ढगांचा कडकडाट आणि विजांच्या लखलखाटासह नवी मुंबइमध्ये दमदार हजेरी लावली आहे.

Swapnil S

नवी मुंबई : जून महिन्यात साधारणतः बरसणाऱ्या मान्सून अगोदरच यंदा मे महिन्यात अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्यात सर्वच प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. त्यातच २५ मे रोजी रात्रीपासून नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पनवेल, कोकण किनारपट्टीसह राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस चांगलाच बरसू लागला आहे. ढगांचा कडकडाट आणि विजांच्या लखलखाटासह नवी मुंबइमध्ये दमदार हजेरी लावली आहे.

नवी मुंबईत २५ मे रोजी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. या संततधार पावसाने नवी मुंबई शहराला झोडपून काढले असून शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. नवी मुंबईतील ठिकाणी सेक्टर-११ सीबीडी, नेरूळ, एपीएमसी, औद्योगिक क्षेत्रात गुडघाभर पाणी साचले होते. एकंदरीतच पावसामुळे नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले.

शहरात ३ ठिकाणी पाणी साचल्याचीण तसेच ४ ठिकाणी झाडे पडल्याची तक्रार नोंद झाल्याचे महापालिका आपत्ती निवारण कक्षातून सांगण्यात आले. शहरातील एपीएमसी, औद्योगिक परिसरात प्रचंड प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूककोंडी झाली. महापे औद्योगिक परिसरात नैसर्गिक नाल्यात भराव टाकल्याने काही ठिकाणी पाणी भरले होते. एपीएमसी आवारात भाजी मार्केट, दाणा बाजार परिसरात पाणी साचल्याने व्यापाऱ्यांना याचा फटका बसला आहे. औद्योगिक परिसरात नाल्यांचे पाणी रस्त्यावर ओसंडून वाहत असल्याने महापे, पावणे, तुर्भे एमआयडीसी परिसराला अक्षरशः तलावाचे स्वरूप आले होते.

पावसाळी स्थितीवर आयुक्तांचे लक्ष

२५ मेपासून बरसत असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नवी मुंबई महापालिका मुख्यालयात पहिल्या मजल्यावर असलेल्या इंटिग्रेटेड नियंत्रण कक्षात जाऊन शहरात ठिकठिकाणी लावलेल्या सीसीटीव्हींच्या दृश्यांची पाहणी करीत सद्यस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मध्यवर्ती आपत्ती निवारण कक्षाशी ०२२-२७५६७०६०/६१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

नवी मुंबईच्या नालेसफाईचे पितळ उघडे

नवी मुंबईत रविवारी रात्रभर पाऊस सुरू होता, तर सकाळी काहीशी विश्रांती घेत नऊनंतर पुन्हा सुरू झाला. या पावसाने नालेसफाई आणि पोलखोल झाली. जागोजागी पाणी साठत होते. तर शहरातील बहुतांश अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साठले होते. शहरात नालेसफाई नव्वद टक्के पूर्ण झाल्याचा प्रशासनाने केलेला दावा या पावसाने फोल ठरवला आहे.

नालेसफाईची निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही, मात्र गटार सफाई पूर्ण झाल्याचा दावा केला गेला होता. मात्र रविवारी रात्री ते समोवारी सकाळी ११ वाजेपर्यंत केवळ सरासरी ४७. ४८ मिमीच्या पावसाने गटार सफाईचे पितळ उघडे पडले आहे.

रविवार रात्रीपासून सोमवारी संध्याकाळी ४.३० पर्यंत सरासरी पाऊस

  • बेलापूर - १३३.९० मिमी

  • नेरूळ - १५५.७० मिमी

  • वाशी - ५७.६६ मिमी

  • कोपरखैरणे - ५३.३४ मिमी

  • ऐरोली - ४२.८० मिमी

  • दिघा - ४१.३० मिमी

  • सरासरी - ८०.७८ मिमी

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video