ठाणे, नवी मुंबईत रॉकेट फटाक्यांना बंदी; ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे आदेश 
ठाणे

ठाणे, नवी मुंबईत रॉकेट फटाक्यांना बंदी; ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे आदेश

रॉकेट व अन्य उडणाऱ्या वेगवेगळ्या फटाक्यांमुळे ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत रॉकेट व तस्सम उडवण्याच्या फटाक्यांच्या वापर करण्यावर पूर्ण प्रतिबंध राहील.

Swapnil S

ठाणे : जिल्ह्यात रॉकेट व अन्य उडणाऱ्या वेगवेगळ्या फटाक्यांमुळे ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत रॉकेट व तस्सम उडवण्याच्या फटाक्यांच्या वापर करण्यावर पूर्ण प्रतिबंध राहील. हे प्रतिबंध सार्वजनिक व खासगी जागा, इमारतींच्या गच्च्या, बाल्कनी, आवारारे आणि सर्व रहिवासी भागात लागू राहील. हा आदेश ९ नोव्हेंबर रोजीच्या ००.०१ वाजेपासून ते दि. ८ जानेवारी २०२७ रोजीच्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत पर्यंत लागू राहील.

दाट लोकवस्तीच्या ठिकाणी, गच्ची (टेरेस) येथून मोठ्या प्रमाणावर रॉकेट, हवेत उडणारे फटाके व तसम फटाके उडविले जात असल्याचे तसेच अशा फटाक्यांमुळे इमारतींना आग लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रतिबंधात्मक आदेश देणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलमांन्वये पुढील महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत.

नवी मुंबईत आगीच्या ७४ घटना

दिवाळीत नवी मुंबई फटाक्यांमुळे आगीच्या ७४ घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हवेत उडणाऱ्या रॉकेटसह तत्सम फटाक्यांच्या वापरावर दोन महिन्यांसाठी बंदी घातली आहे. ९ नोव्हेंबर २०२६ पासून ८ जानेवारी २०२७ पर्यंत हा प्रतिबंध लागू राहणार आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिला आहे.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या विशेष भरारी पथकांना लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित पोलीस अधिकारी, महापालिकेचे विभागप्रमुख, विभाग अधिकारी आणि अग्निशमन विभागावर अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील कलम ५१ आणि ६० नुसार कारवाई केली जाणार आहे. तसेच गृहनिर्माण संस्थांनीही आपल्या सभासदांना या आदेशाची माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

७४ ठिकाणी आगीच्या घटना

दिवाळीच्या काळात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी आगीच्या ७४ घटना घडल्या आहेत. या दुर्घटनांमध्ये सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान झाले असून, नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला. जिल्हाधिकारी, ठाणे यांनी जारी केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त तथा शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास शिंदे यांनी नवी मुंबई महापालिका क्षेत्रातही या आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत मुंबईत पहिला गुन्हा दाखल; लग्नाचे आमिष दाखवून फसवणुकीचा आरोप

Mumbai : कन्व्हेयन्स डीड करून देण्याचे बिल्डरला आदेश; कांदिवलीच्या गृहनिर्माण संस्थेला न्यायालयाचा दिलासा

'विहार' खोदणार दुसरा बोगना; 'तुळशी' द्वारे २७० मीटर खोदकाम पूर्ण, दुहेरी बोगद्याच्या खोदकामाला वेग, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता

'गोकुळवर्चस्वा'चा आज फैसला; संघर्ष मोर्चात ८० हजार कोल्हापूरकर सहभागी, शासननियुक्त ४ संचालकांना मतदानाचा अधिकार

मणिपूरमध्ये ३० एप्रिलपर्यंत जनगणना स्थगित; उच्च न्यायालयाचे निर्देश