TMC 
ठाणे

जूनपर्यंत संपूर्ण कराची रक्कम भरल्यास १० टक्के सूट; मालमत्ता कर वसुलीसाठी ठाणे महापालिकेची योजना

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नव्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीची मोहीम १ एप्रिलपासूनच सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार करदात्यांच्या मोबाइलवर एसएमएसच्या माध्यमातून महापालिकेने बिले पाठविण्यास सुरवात केली आहे. याशिवाय १५ जूनपर्यंत संपूर्ण कराची रक्कम एकत्रित भरतील, अशा करदात्यांना मालमत्ता कराच्या सामान्य करात १० टक्के सूट देण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने...

Swapnil S

ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नव्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीची मोहीम १ एप्रिलपासूनच सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार करदात्यांच्या मोबाइलवर एसएमएसच्या माध्यमातून महापालिकेने बिले पाठविण्यास सुरवात केली आहे. याशिवाय १५ जूनपर्यंत संपूर्ण कराची रक्कम एकत्रित भरतील, अशा करदात्यांना मालमत्ता कराच्या सामान्य करात १० टक्के सूट देण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने स्पष्ट केले आहे. आता ही सवलत योजना ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.

जे करदाते २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर, अशी संपूर्ण कराची रक्कम एकरकमी १५ जूनपर्यंत महापालिकेकडे जमा करतील, अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या देयकातील सामान्य करामध्ये १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. यानुसार १५ जूनपर्यंत रक्कम भरल्यास १० टक्के सूट दिली जाणार आहे. तर १६ ते ३० जून या कालावधीत या रकमेचा भरणा केल्यास ४ टक्केऐवजी १० टक्के सूट दिली जाणार आहे.

१ ते ३१ जुलै या कालावधीत भरल्यास ३ टक्के आणि १ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत भरल्यास २ टक्के सवलत दिली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने दिली आहे.

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’

मोदींचे पंतप्रधानपद, लोकसभा सदस्यत्व रद्द करा; काँग्रेस हायकोर्टात याचिका दाखल करणार

संतोष देशमुख हत्याप्रकरण: मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच; विशेष मकोका न्यायालयाचे निरीक्षण

२०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना लॉटरी; मिळणार ५०० चौरस फुटांचे घर, शासकीय भूखंडावरील अतिक्रमण धारकांना राज्य सरकारचा दिलासा

मोबाईल भानामती