एल निनोला ठाण्याच्या पावसाचा चकवा; जुलैत गेल्या वर्षीपेक्षा तब्बल १२४ टक्के अधिक पर्जन्यमान प्रातिनिधिक छायाचित्र
ठाणे

एल निनोला ठाण्याच्या पावसाचा चकवा; जुलैत गेल्या वर्षीपेक्षा तब्बल १२४ टक्के अधिक पर्जन्यमान

प्रशांत महासागरातील एल निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सून कमकुवत राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. मात्र, ठाण्यात जुलै महिन्यात पावसाने सर्व अंदाजांना चकवा देत तब्बल १,६७१.४० मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षीच्या जुलै (२०२५) महिन्याच्या तुलनेत हा पाऊस ९२४.५६ मिमी, म्हणजेच सुमारे १२४ टक्के अधिक ठरला आहे.

Swapnil S

ठाणे : प्रशांत महासागरातील एल निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सून कमकुवत राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. मात्र, ठाण्यात जुलै महिन्यात पावसाने सर्व अंदाजांना चकवा देत तब्बल १,६७१.४० मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षीच्या जुलै (२०२५) महिन्याच्या तुलनेत हा पाऊस ९२४.५६ मिमी, म्हणजेच सुमारे १२४ टक्के अधिक ठरला आहे.

ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीनुसार, ३० जून २०२६ पर्यंत शहरात ४११.३४ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर जुलै महिन्यात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला आणि ३१ जुलै अखेर एकूण पर्जन्यमान २,०८२.७४ मिमीवर पोहोचले. म्हणजेच केवळ जुलै महिन्यातच १,६७१.४० मिमी पाऊस झाला. मागील वर्षी ३० जून २०२५ पर्यंत ८०९.०९ मिमी पाऊस झाला होता. ३१ जुलै २०२५ पर्यंत एकूण पर्जन्यमान १,५५५.९३ मिमी झाले होते. त्यामुळे जुलै २०२५ मध्ये ७४६.८४ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्या तुलनेत यंदा जुलैमध्ये ९२४.५६ मिमी अधिक, म्हणजेच सुमारे १२४ टक्के जास्त पाऊस झाला आहे.

हवामान बदलामुळे पावसाचे स्वरूपही झपाट्याने बदलत असल्याचे यंदाच्या मान्सूनने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. पूर्वी संपूर्ण हंगामात विखुरलेल्या स्वरूपात पडणारा पाऊस आता कमी दिवसांत अत्यंत तीव्रतेने कोसळत आहे. परिणामी, पूरस्थिती, जलभराव, वाहतूक विस्कळीत होणे आणि नागरी सुविधांवर ताण निर्माण होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
डॉ. प्रशांत सिनकर, पर्यावरण अभ्यासक
भविष्यात अशा अतिवृष्टीच्या घटना वाढण्याची शक्यता लक्षात घेता शहरांमध्ये नैसर्गिक नाले आणि जलमार्गाचे संरक्षण, पावसाच्या पाण्याचे प्रभावी संधारण, सिमेंट काँक्रीटीकरणाला पर्यावरणपूरक पर्याय, भूजल पुनर्भरणाला चालना तसेच हवामान बदलाशी सुसंगत शहरी नियोजन यांना प्राधान्य देणे अत्यावश्यक आहे.
डॉ. प्रमोद साळसकर, पर्यावरण तज्ज्ञ

"माझ्या मुलीला जीवनदान दिलं"; पंतप्रधान मोदींनी माफ केल्यानंतर आईची भावनिक विनंती, म्हणाली - "तिला दत्तक घ्या..."

अभिजीत दिपकेंच्या परदेशातील शिक्षणाचा खर्च कसा केला? RTI कार्यकर्त्याकडून चौकशीची मागणी

IRCTC Beta Website : नव्या बीटा वेबसाइटची कमाल! तत्काळ तिकीट बुकिंगला वेग, पहिल्या ३ मिनिटांत ५ टक्क्यांहून अधिक यशस्वी बुकिंग

प्रक्रिया करणाऱ्या संस्थांना १५ टक्के मालमत्ता कर सवलत; पालिकेचे मुंबईत विकेंद्रित कचरा प्रक्रिया अभियान

Mumbai : कचरा फेकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा! रस्त्यात थुंकणे, घाण करणाऱ्या ४ हजारांहून अधिक जणांवर कारवाई, ७०.०१ लाखांचा दंड वसूल