ठाणे

महिलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न; शिंदे गटाचा आरोप

प्रतिनिधी

काल रात्री ठाण्यामध्ये झालेल्या शिंदे आणि ठाकरे गटामधील राड्यानंतर आता राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना २० ते २५ शिंदे गटाच्या महिलांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर रोशनी शिंदे यांना आधी सिव्हिल रुग्णालयात नंतर संपदा या खासगी रुग्णालयात दखल करण्यात आले. आधी मुख्यमंत्री शिंदेनी पोलिसांची बैठक घेऊन २ तास चर्चा केली. तर ठाकरे कुटुंबाने रोशनी शिंदे यांची भेट घेत शिंदे - फडणवीस सरकरवर सडकून टीका केली. दरम्यान, शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत मारहाण झालीच नसल्याचा दावा केला.

शिंदे गटाच्या पदाधिकारी मीनाक्षी शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, "महिल्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बदनामी करण्याचे हे षडयंत्र आहे. आम्ही रोशनी शिंदेला कोणतीही मारहाण केली नाही. फेसवुकवर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली. यावरून तिला समजावयाला गेल्यानंतर तिने उलटसुलट बोलण्यास सुरुवात केली आणि यामध्ये थोडी धक्काबुक्की झाली. पण, तिला कोणतीही मारहाण आम्ही केलेली नाही. तरीही असे खोटे आरोप करणाऱ्यावर कारवाई करावी लागेल." असा दावा त्यांनी यावेळी केला आहे.

पुढे त्यांनी खासदार राजन विचारे यांच्यावरही गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या, "गेल्या वर्षभरात शिंदे गटाच्या लोकांनी एकही आक्षेपार्ह पोस्ट केलेली नाही. पण इकडच्या खासदारांनी एक टीम बसवली असून त्यातून आक्षेपार्ह विधाने तयार करून फेसबुकवर टाकायला लावायची त्यांची सिस्टीम सुरु आहे. त्याला आम्ही आजपर्यंत प्रत्युत्तर दिलेले नाही. पण आता डोक्याच्या वर जाते आहे. माझे खासदारांना आव्हान आहे, तुमच्यामध्ये थोडा जरी पुरुषार्थ शिल्लक असेल, तर तुम्ही स्वत: रस्त्यावर उतरा. एका मुलीच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत बसणार असाल तर याचा निषेध ठाण्याची महिला आघाडी करत राहणार आहे."

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

विभवकुमारने केली लाथाबुक्क्यांनी मारहाण; स्वाती मालीवाल यांनी नोंदविला 'एफआयआर'

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

छगन भुजबळ नाराज; प्रचारात फारसे सक्रिय नसल्याने चर्चांना उधाण

सिंचन घोटाळ्यात तथ्य, मात्र अजितदादा दोषी नाहीत - फडणवीस