Thane : अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी  
ठाणे

Thane : अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ठाण्यातील विशेष न्यायालयाने एका ३० वर्षीय व्यक्तीला २० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. कायद्यानुसार अल्पवयीन मुला-मुलींची संमती निरर्थक ठरते, असे स्पष्ट निरीक्षण नोंदवत न्यायालयाने बचाव पक्षाचा प्रेमसंबंधांचा युक्तिवाद फेटाळून लावला.

Swapnil S

ठाणे : एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ठाण्यातील विशेष न्यायालयाने एका ३० वर्षीय व्यक्तीला २० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. कायद्यानुसार अल्पवयीन मुला-मुलींची संमती निरर्थक ठरते, असे स्पष्ट निरीक्षण नोंदवत न्यायालयाने बचाव पक्षाचा प्रेमसंबंधांचा युक्तिवाद फेटाळून लावला.

विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश प्रेमल विठलानी यांनी सोमवारी धनेश्वर ऊर्फ धुळेश्वर पुजीयालाल कलासुवा याला वारंवार बलात्कार आणि पोक्सो कायद्याच्या अंतर्गत दोषी ठरवले. दरम्यान, न्यायालयाने कलासुवा याला अपहरणाच्या आरोपातून मुक्त केले. पीडित मुलगी तिच्या कुटुंबापासून वाचण्यासाठी आणि लग्न करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या इच्छेने आरोपीसोबत राजस्थानमधील त्याच्या गावी गेली. त्यामुळे फूस लावून नेणे हा अपहरणाचा कायदेशीर घटक या प्रकरणात दिसून येत नाही, असे न्यायालयाने नमूद केले.

प्रकरण काय

जुलै २०२२ मध्ये कापूरबावडी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित मुलगी माजिवडा भागात आरोपीच्या चहाच्या टपरीशेजारी कडधान्ये विकत असे. तिने आपल्या आईला सांगितले होते की, तिचे आरोपीसोबत प्रेमसंबंध आहेत. जून २०२१ ते जून २०२२ दरम्यान, आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. तेव्हा २६ वर्षांचा असलेला आरोपी आणि ती मुलगी घरून पळून राजस्थानमधील त्याच्या गावी गेले होते. ती परत आल्यानंतर केलेल्या वैद्यकीय तपासणीत २० आठवड्यांची गरोदर आढळली. त्यानंतर ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिचा गर्भपात करण्यात आला. डीएनए चाचणीत आरोपीच त्या गर्भाचा पिता असल्याचे सिद्ध झाले, अशी माहिती सरकारी पक्षाने दिली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : गोरेगाव-मुलुंड २० मिनिटांत; जीएमएलआर प्रकल्पात ‘तुळशी’ खोदणार बोगदा, नॅशनल पार्कखाली भूमिगत बोगदा

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : मुख्य आरोपी सचिन अंदूरेला जामीन; जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती, HC चा मोठा निर्णय

बापरे! मध्यान्ह भोजनात मिठाऐवजी चक्क डिटर्जंट? जेवणानंतर २४ हून अधिक विद्यार्थी रुग्णालयात दाखल, VIDEO

संतापजनक! पालघरमध्ये १० वर्षांच्या मुलीवर ५० वर्षीय काकाकडून अत्याचार; FIR नोंदवण्यास पोलिसांची टाळाटाळ? कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Mumbai : चर्चगेट येथील मुलींच्या हॉस्टेलमधील पाणीटंचाईची हायकोर्टाकडून दखल; महापालिका आणि विद्यापीठाला नोटीस