ठाणे

Thane : नोकरदार महिलांना मिळणार ठाण्यात हक्काचा निवारा; महापालिका उभारणार ९ मजली वसतिगृह

नोकरीनिमित्त ठाणे शहरात येणाऱ्या शेकडो महिलांसाठी ठाणे महापालिका हक्काचा निवारा देणार आहे.

Swapnil S

ठाणे : नोकरीनिमित्त ठाणे शहरात येणाऱ्या शेकडो महिलांसाठी ठाणे महापालिका हक्काचा निवारा देणार आहे. यासाठी भाईंदरपाडा येथील पालिकेच्या सुविधा भूखंडावर यासाठी ९ मजली अद्ययावत इमारत बांधण्याचा निर्णय ठाणे पालिकेने घेतला आहे. या वसतिगृहात जवळपास ४०२ नोकरदार महिलांना राहता येणार आहे. अत्यंत माफक दरात महिलांना राहण्यासाठी वसतिगृह उपलब्ध होणार असून यासाठी केंद्राकडून ५० कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. या संदर्भातील प्रस्ताव नुकत्याच झालेल्या प्रशासकीय महासभेत मंजूर करण्यात आला आहे.

मागील काही वर्षांपासून ठाण्यात नागरीकरण झपाट्याने वाढत आहेत. त्याच बरोबर शहरात आयटी पार्क, खासगी कंपन्यांचे कार्यालयांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या जास्त असल्याने नोकरदार महिलांचा ठाणे शहरात ओढा वाढलेला आहे. दरम्यान, उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहामुळे ठाण्यात नोकरीसाठी येणाऱ्या महिलांना राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळवण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. विधवा, घटस्फोटित आदी महिलांसह कुटुंबातील जवळचे कोणतेही सदस्य त्या शहरात नाहीत, अशा विवाहित महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. याशिवाय नोकरीसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांनाही या ठिकाणी ३० टक्क्यांपर्यंत जागा आरक्षित असणार आहेत.

या इमारतीत पुरेशी पार्किंग व्यवस्था, फुड कोर्ट, व्यायाम शाळेकरिता पुरेशी जागा अशा सुविधांचा अंतर्भाव असणार आहे. इमारतीचे बांधकाम क्षेत्र ४ हजार ५२३ चौ.मी. इतके असून इमारत उभारण्यासाठी ५० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. महिलांच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेली वॉकिंग वुमन हॉस्टेल योजना सुरू केली. व्यावसायिक कामामुळे घराबाहेर पडणाऱ्या महिलांना सोयीस्कर निवासस्थान उपलब्ध करून देण्यासाठी महिला वसतिगृह बांधण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी स्पष्ट केले. त्यानुसार या कामाच्या उभारणीचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या प्रशासकीय महासभेत मंजूर झाला आहे. त्यानुसार येत्या काही महिन्यांत या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार असून नोकरदार महिलांना ठाण्यात राहण्यासाठी निवारा उपलब्ध होणार आहे.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत