ठाणे

बदलापूरच्या महाराजाचे थाटामाटात आगमन

बदलापूरसह मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या शहरातील हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या बदलापूरच्या महाराजाचे थाटामाटात आगमन झाले.

Swapnil S

बदलापूर : बदलापूरसह मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या शहरातील हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या बदलापूरच्या महाराजाचे थाटामाटात आगमन झाले. वाद्यांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत, गणपती बाप्पा मोरया अशा जयघोषात सजवलेल्या रथातून बदलापूरच्या महाराजाचे आगमन झाले. रविवारी रात्री गणेश भक्तांच्या प्रचंड गर्दीत रंगलेला हा दिमाखदार सोहळा मोठ्या उत्साहात सुरू होता.

गणेशोत्सवाचे यंदाचे ५३ वे वर्ष असून दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात अनेक कार्यक्रमांची रेलचेल तर आहेच. परंतु विशेष आकर्षण आहे ते बाप्पासाठी सजणाऱ्या राम मंदिराच्या देखाव्याचे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक स्व. नितीन देसाई हे जरी हयात नसले, तरीही यंदा देखील एन.डी. स्टुडिओ मधूनच हा देखावा साकारण्यात येणार आहे. यापूर्वीही या मंडळाने माघी गणेशोत्सवात ख्यातनाम कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून पुण्यातील शनिवार वाड्याचा देखावा साकारला होता.

माघी गणेशोत्सवानिमित्त बदलापुरात जत्राही भरत असते. जत्रेनिमित्त येणारे आकाश पाळणे, मेरी गो राऊंड, मिठाई, खाद्य पदार्थ तसेच शोभिवंत वस्तूंची दुकानेही या जत्रेत असतात. त्यामुळे जत्रेच्या दहा दिवसांच्या काळात मोठी गर्दी होत असते. त्यामुळे अनेक विक्रेते त्यांच्या वस्तूंची तसेच खाद्यपदार्थांची व खेळण्यांची विक्री करण्यासाठी इथे येत असतात. तसेच आदिवासी बांधवांच्या बांबूच्या कलाकुसरीच्या वस्तूंना नागरिकांची विशेष पसंती मिळत असते.

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

अहिल्यानगरमध्ये तणाव; रास्ता रोको, लाठीमार

भारत-भूतान रेल्वेमार्गाने जोडणार; प्रकल्पाचा संयुक्त आराखडा जाहीर

पीडितांकडे न्यायालयाचे दुर्लक्ष नको; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू; केरळ भाजप प्रवक्त्याचे धक्कादायक विधान