ठाणे

रील बनवून पुलावरून खाडीत उडी मारणाऱ्या युवकाचा मृतदेह सापडला

रोहित अशोक मोर्या असे खाडीत उडी मारणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो भिंवडी येथील साईनगर येथील कामत घर येथे राहत होता.

Swapnil S

डोंबिवली : इन्स्टाग्रामावर रील बनवून एका २५ वर्षीय तरुणाने मोठा गाव माणकोली पुलावरून खाडीत उडी मारल्याची घटना शुक्रवार, २३ तारखेला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेकडील रेती बंदर रोडवरील मोठा गावजवळील खाडीत घडली होती. याची माहिती मिळताच विष्णूनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तर अग्निशामक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी जाऊन शोध कार्य सुरू केले होते. रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास खाडीत शोध कार्य सुरू असताना अग्निशामक दलाच्या जवानांना युवकाचा मृतदेह सापडला. रोहित अशोक मोर्या असे खाडीत उडी मारणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो भिंवडी येथील साईनगर येथील कामत घर येथे राहत होता.

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला