ठाणे

भिवंडीतील पूल पहिल्या पावसातच गेला वाहून

Swapnil S

भिवंडी : भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेला कुहे ग्रामपंचायत हद्दीतील मढवी पाडा, भरे नगर भंडारपाडाकडे जाणारा पूल पहिल्याच पावसात कोसळल्याने आदिवासी दुर्गम भागातील आदिवासी बांधवांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये सार्वजनिक बांधकाम उपविभाग विरोधात संतापाची लाट उसळली असून गेल्या दोन महिन्यापूर्वी बांधलेला पूल दोन दिवसांपूर्वी सुरुवातीच्या पावसात कोसळल्याने सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा भ्रष्ट कारभार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी श्रमजीवी संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंत्यांकडे पुलाचे निकृष्ट दर्जाचे काम केलेल्या संबधित ठेकेदारासह अभियंत्यावर कारवाईसह सदर पूल तात्काळ बांधून देण्याची मागणी एका पत्राद्वारे केली आहे. याबाबतीत सविस्तर माहिती अशी की, भिवंडी तालुक्यात चिंबिपाडा परिसर हा बहुल आदिवासी विभाग आहे. येथील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात डोंगर-दऱ्यात वस्ती करून राहत आहे.

कुहे ग्रामपंचायत ही आदिवासी हद्दीत आहे. या ग्रामपंचायत हद्दीतील मढवी पाडा, भरे नगर भंडारपाडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम उपविभागाने गेल्या दोन महिन्यांपूर्वी एका छोट्या नदीवर पूल बांधला होता, पहिल्याच पावसात हा पूल वाहून गेल्याने पुलालगत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची अडचण निर्माण झाल्याने येथील आदिवासी बांधवांनी संताप व्यक्त करतांना सांगितले की, आमच्या आदिवासी बांधवांची गेल्या अनेक दिवसांपासून या पुलाची मागणी करण्यात आली होती.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?