ठाणे

मुरुड-जंजिरामध्ये पर्यटकांची संख्या रोडावली

आठवड्याला सुद्धा पर्यटक या ठिकाणी फिरकले नसल्याने समुद्र किनारी फारशी गर्दी दिसली नाही

प्रतिनिधी

मुरुड तालुका हे पर्यटन स्थळ असल्यामुळे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते, दर वर्षी जगभरातील पर्यटक येथील जंजिरा किल्ला, मुरुड येथील निळसर समुद्र पाहण्यासाठी लाखो पर्यटक ये-जा करीत आसतात, परंतू पर्यटकांची संख्या कमी झाल्याने हाॅटेल्स, लाॅजींग, घरगुती खाणावळी, घोडेस्वार यांना मोठा फटका बसलेला दिसुन येत आहे. शनिवार-रविवारी पर्यटकांनी गजबजलेले किनारे ओस पडलेले पाहावयास मिळत आहे. त्यामुळे येथील व्यवसायिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाचा ओघ कमी असतो, त्यामुळे या महिना अखेरच्या आठवड्यापासून समुद्रकिनारी गर्दी पहावयास मिळत असते.

परंतु सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्याला सुद्धा पर्यटक या ठिकाणी फिरकले नसल्याने समुद्र किनारी फारशी गर्दी दिसली नाही. या वर्षी घटस्थापनेच्या दिवशी राज्य शासनाने सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली होती. म्हणजेच पर्यटनासाठी शनिवार रविवार व सोमवार असे तीन दिवस सलग सुट्टी असून सुद्धा पर्यटक फारश्या प्रमाणात मुरुड किनारी न आल्याने समुद्र किनारी असणारे सर्व व्यवसाय ठप्प पडले होते. मोठ्या प्रमाणात पर्यटक न आल्याने सर्व व्यवसायावर याचा परिणाम झाला आहे. सप्टेंबर महिन्यात निराशा झाल्याने निदान ऑक्टोबर मध्ये तरी पर्यटन बहरेल अशी अपेक्षा सर्व हॉटेल व्यवसायिक करीत आहेत.

Mumbai News : ठाणे-कल्याण मार्गावरील लोकलची गर्दी कमी होणार? मध्य रेल्वेचा ‘गेमचेंजर’ ठरू शकणारा जबरदस्त प्लॅन

‘पुढील पंतप्रधान मराठीच’ या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा खुलासा; विविध मुद्द्यांवर भाष्य करत केंद्र सरकारवर हल्लाबोल

कॅमेरुन ग्रीनवर लागली २५.२० कोटी रुपयांची बोली; पण मिळणार 'इतकेच' कोटी

लाइक, कमेंट अन् व्हायरल! Insta रिल्समुळे २० वर्षांच्या तरुणाला थेट IPL लिलावात एंट्री? कोण आहे इझाझ सावरिया?

National Herald Case : नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय? २०१२ पासून आजपर्यंत काय घडलं?