ठाणे

स्मार्ट सिटीची चौकशी गुंडाळली जाण्याची शक्यता

प्रतिनिधी

अडीज वर्षांपूर्वी राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते. काही महिन्यापूर्वी ठाण्यातील स्मार्ट सिटी योजनेतील गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी भाजपच्या काही नेत्यांनी दिल्लीत जाऊन केली होती. ठाणे शहरात राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी योजनेतील बहुतांशी महत्वाचे प्रकल्प भाजप नगरसेवकांच्या प्रभागातच राबवण्यात येत असून केंद्राच्या स्मार्ट चौकशीवरून भाजपमध्ये फूट पडली असल्याचे चित्र होते. दरम्यान आता राज्यात सत्ताबदल झाला असल्याने ठाणे पालिकेतील सत्तेची समीकरणेही बदलणार असल्याने स्मार्ट सिटीची चौकशी गुंडाळली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्मार्ट सिटी योजनेतील बहुतांशी कामांमध्ये गैरव्यवहार झाला आहे. बहुसंख्य कामे संथपणे -सुरू असल्याबाबत ठाणे शहर भाजपच्या वतीने राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे, आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे, शहर उपाध्यक्ष सुजय पत्की केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याकडे तक्रार केली होती, आणि पुरी यांनी चौकशीचे आदेशही दिले होते.स्मार्ट सिटीची जी कामे सुरु आहेत त्या संदर्भात काही माहिती केंद्र सरकारने मागितली होती ती माहिती फेब्रुवारी महिन्यातच पाठवली असल्याचे पालिकेने सांगितले.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल