ठाणे

तरुण पिढीने मर्दानी खेळ अंगिकारले पाहिजे

शिवकालीन मर्दानी खेळाकडे वळून शरीराचा तंदुरुस्त पणा राखावा असे महत्व पूर्ण प्रतिपादन अलिबाग मुरुड विधानसभा क्षेत्राचे आमदार महेंद्र दळवी यांनी केले आहे

वृत्तसंस्था

शिवकालीन मर्दानी खेळ हे आजच्या तरुणांनी अंगिकारले पाहिजे. शरीराची कसरत होणे आज खूप जरूरीचे आहे. भ्रमणध्वनीमुळे बैठेपणा वाढला आहे. अंगाला मेहनत अशी राहिली नाही. शारीरिक तंदुरुस्तीसाठी आजच्या तरुणांनी शिवकालीन मर्दानी खेळाकडे वळून शरीराचा तंदुरुस्त पणा राखावा असे महत्व पूर्ण प्रतिपादन अलिबाग मुरुड विधानसभा क्षेत्राचे आमदार महेंद्र दळवी यांनी केले आहे.

आमदार महेंद्र दळवी यांच्या पुढाकाराने कोल्हापूरी मर्दानी खेळांचे आयोजन मुरुड नगरपरिदेच्या प्रांगणात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शस्र अभ्यासक विनोद साळोखे, कोल्हापूर यांच्या चमुने रन हलगी, घुमक व कैताळ या पारंपारिक वाद्यांच्या तालावर तलवारबाजी, दांडपट्टा, फरी गडणा, लाठी काठी आदी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून मर्दानी खेळांमुळे अक्षरश : भारावून टाकले. १८ जणांच्या चमूमध्ये ६ वर्षांचा शिबेत राजे साळोखे, ८ वर्षांचा संस्कार चोगले, १०वर्षांचा शंभुराजे साळोखे यांच्या दांडपट्ट्या वरील कमालीची पकड तर प्राजक्ता भिसेकर, श्रेयस जाधव, सोमेश पाटील, साक्षी पाटील या महाविघालयीन विद्यार्थ्यांनी तलवार बाजी व लाठी काठीतील चापल्य सर्वांनाच भावले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक