ठाणे

साडेतीन लाखांची ऑनलाईन फसवणूक

सायबर गुन्हेगाराने ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Swapnil S

भाईंंदर : नवघर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या इसमाची टुरिस्ट गाडी बुक करण्याच्या नावाखाली साडेतीन लाखाची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनीत अग्रवाल हे भाईंदर पूर्वेला राहत असून त्यांनी शिर्डी-शनिशिंगणापूर येथे दर्शनाला जाण्यासाठी भाड्याने गाडी मिळावी, यासाठी इंटरनेटवर एका वेबसाइटर शोध घेतला. त्यांना त्या वेबसाइटवर मोबाईल क्र. भेटला. त्यानंतर त्यांनी त्या मोबाईल क्रमांकावर फोन केला असता विजय सिंग या इसमास फोन लागला. त्यावेळी शिर्डी-शनिशिंगणापूर येथे दर्शनाला जाण्यासाठी ७ सिटर कार भाड्याने हवी आहे असे सांगितले. त्यावर त्याने त्या कारचे भाडे १४ रु. प्रति किलोमीटर दर व टोल टॅक्स हे पॅकेजमध्ये राहील, असे सांगितले. त्यानंतर त्यांने त्याच वेबसाईटवर १५० रु. ॲडवान्स भरण्यास सांगितले.

अग्रवाल यांनी वेबसाईटवर पैसे पाठवण्याचा प्रयत्न केला परंतु ओटीपी येत नव्हता, म्हणून पुन्हा त्याला फोन केला असता त्याने एक लिंक पाठवून त्या लिंकवर क्लिक करा व त्यावर पेमेंट करा असे सांगितले. त्याने दिलेल्या लिंकवर क्लिक केले असता अग्रवाल यांना मेसेज आले. त्यांच्या बँकेच्या क्रेडिट कार्डमधून २ लाख ७१ हजार ९८० रु. कट झाल्याचा मेसेज आला.

दुसऱ्या क्रेडिट कार्डमधून ६२ हजार ४८० रुपये, तिसऱ्या कार्डमधून २२ हजार ९९९ रुपये असे एकूण ३ लाख ५७ हजार ४७७ रुपये बँकेच्या क्रेडिट कार्डमधून पैसे डेबिट झाल्याचे मेसेज आले. अग्रवाल यांची विजय सिंग या सायबर गुन्हेगाराने ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले