ठाणे

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला तीन वर्षांचा कारावास

अल्पवयीन मुलीला टीव्ही बघण्यासाठी घरात बोलवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे

Swapnil S

ठाणे : अल्पवयीन मुलीला टीव्ही बघण्यासाठी घरात बोलवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या ७५ वर्षीय मौनुद्दीन अजीजउल्ला अन्सारी या नराधमाला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश तसेच भिवंडी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. के. कारंडे यांनी गुरुवारी आरोपीला दोषी ठरविल्याची माहिती सरकारी वकील विजय मुंढे यांनी दिली.

भिवंडीत ९ नोव्हेंबर २०२१ रोजी ५ वर्षीय पीडित मुलगी दुपारच्या सुमारास आपल्या घराबाहेर खेळत होती. यावेळी शेजारी राहणाऱ्या आरोपी अन्सारी याने तिला टीव्ही पाहण्यासाठी त्याच्या घरात बोलवून तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार शांतीनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सरकारी वकील विजय मुंढे यांनी सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून अन्सारी याला दोषी ठरविण्यात आले. तसेच तीन वर्षांचा सश्रम कारावासाबरोबर ५ हजार दंड अशी शिक्षा सुनाविण्यात आली आहे. याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सूर्यवंशी यांनी तपास केला होता.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस