ठाणे

रेमंडप्रकरणी आदिवासी शेतकऱ्यांचे उपोषण: आदिवासींच्या बेकायदेशीर जमीन हस्तांतरितप्रकरणी ठाणे जिल्हाधिकारी येणार अडचणीत?

आदिवासी शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या शेतजमिनी सातबारा उतारा वारस हक्काने आदिवासी कुळाच्या नावावर असताना या जमिनी बेकायदेशीरपणे बळकावण्यात आले

Swapnil S

ठाणे : ठाणे येथील पांचपाखडी येथील सर्व्हे नं. १२७, १२८ अ / ब, १२९/१ या मूळनिवासी आदिवासी शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या शेतजमिनी सातबारा उतारा वारस हक्काने आदिवासी कुळाच्या नावावर असताना या जमिनी बेकायदेशीरपणे बळकावण्यात आले असल्याप्रकरणी रेमंड कंपनीविरोधात अनेक वेळा आदिवासी बांधव आणि जिजाऊ संघटना यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे न्याय मागत कारवाईची मागणी करून देखील याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून कुठलीच हालचाल न झाल्याने आता राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडूनच याप्रकरणाचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिल्याने आता जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे अडचणीत येणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.

तर तर दुसरीकडे ८ जानेवारी रोजी पिडीत शेतकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे, हुतात्मा राघोजी भांगरे चौक समोर, शासकीय विश्रामगृहशेजारी तीव्र आंदोलन छेडत आमरण उपोषण पुकारले आहे. या आंदोलनास जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी पाठिंबा दर्शविला असून, न्याय मिळेपर्यंत ते पीडित आदिवासी यांच्यासोबत राहणार असल्याचे सांबरे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : अपात्र लाभार्थ्यांनी लाटले २६ हजार कोटी!

विधान परिषद निवडणूक : बंडखोरी मोडण्यासाठी सर्वच पक्षांची धावपळ; १७ पैकी ६ जागी युतीचे पारडे जड

Mumbai : नऊ वर्षांपासून दुकान नोंदणी शुल्क बंद; पालिकेच्या तिजोरीला ५०० कोटींचा फटका!

शाळेच्या बसचा प्रवास महागणार! शुल्कात १५ टक्के वाढ; जूनपासून भाडेवाढ लागू , वाढत्या महागाईत पालकांच्या खिशाला कात्री

दिल्लीच्या हॉटेलात आग, २१ बळी; मृतांमध्ये १७ परदेशी नागरिक, मृत्यूच्या भीतीने उड्या मारल्याने अनेक जखमी