ठाणे

डोंबिवलीत रेल्वेची भिंत कोसळून दोन मजुरांचा मृत्यू

वृत्तसंस्था

डोंबिवलीत रेल्वेच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू असताना बाजूला असणारी जुनी भिंत अंगावर कोसळून दोन कामगार मृत तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कोपर रोडवरील सीमा डेकोरेटरजवळ घडली. या घटनेतील मृत कुटुंबीयांना रेल्वे प्रशासनाने मदत जाहीर करावी, अशी मागणी ज्येष्ठ माजी नगरसेवक राजेश मोरे यांनी पत्रकारांशी केली.

डोंबिवली पश्चिम सिद्धार्थ नगर परिसरात दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मल्लेश चव्हाण (३५) , बंडू कोवासे (५०) या दोघांचा मृत्यू झाला असून माणिक ओवर, विनायक चौधरी, युवराज वेडगुत्तलवार अशी जखमींची नावे आहेत. हे सर्व कामगार मुलाचे आंध्र येथे राहणारे असून सध्या ते दिवा आणि मुंब्रा परिसरात राहत आहेत. ही घटना घडल्यावर सिद्धार्थ नगर गोंधळी समाज जोशी मित्रमंडळ वस्तीतील तरुण मदतीला धावून आले. मजुरांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी संबंधित सुपरवायझर व ठेकेदारांवर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती डोंबिवली सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिली.

निवडणुकीनंतरही संघर्षमय राजकारण

ऑनलाईन गेमची उलाढाल

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक

महिंद्राच्या 'या' नवीन SUV ची जबरदस्त क्रेझ! अवघ्या 1 तासात 50,000 हून अधिक गाड्यांचे बुकिंग! पाहा फीचर्स अन् किंमत

ठाकरे गटाचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ‘एनडीए’ला बहुमत मिळणार; देवेंद्र फडणवीस यांना विश्वास