ठाणे

उध्दव ठाकरे यांना निवडणुकीपूरतीच छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण - मंत्री दादासाहेब भिसे

शंकर जाधव

गद्दार गद्दार ,खोके खोके, पाठीत खंजीर असा आमच्यावर आरोप होत आहे. एवढेच नव्हे तर शिवसैनिकांचा बाप काढला. आता आम्ही अस म्हणतो की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो वापरू नका, नंतर निवडणुका लढवून दाखवा. त्यांना निवडणुकीपुरती छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण होते आणि नंतर विसर पडतो अशी टीका महाराष्ट्र राज्याचे बंदरे आणि खणी कर्म मंत्री मा. दादासाहेब भूसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मेळाव्यात केली.तर मुंबईतही सर्वात मोठ्या मैदानात दसरा मेळावा भरवू असे भिसे म्हणाले.

डोंबिवली कल्याण शीळ रोड येथील पाटीदार भवन येथे शिवसेना "हिंदूगर्वगर्जना" शिवसेना संपर्क यात्रा असा कार्यकर्त्यांचा मेळावा भरवण्यात आला होता. या मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे बंदरे आणि खणी कर्म मंत्री दादासाहेब भूसे बोलत होते.यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार विश्वनाथ भोईर, माजी नगरसेवक राजेश मोरे, राहुल लोंढे, राजेश कदम, रमेश म्हात्रे, दीपेश म्हात्रे आदींसह अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री भिसे म्हणाले,शिवसैनिकांचा बाप काढणाऱ्यांचे विचार संकुचित आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते की आमच्याकडे बोलण्यासारखे खूप आहे.तोंड उघडले की घराबाहेर पडणं मुश्किल होईल. 40 आमदार ज्यावेळी असा निर्णय घेत होते यामागे काहीतरी भूमिका असणारच. जर आम्ही तसे असतो तर एवढा मोठा जनतेचा महासागर मुख्यमंत्री शिंदेंच्या पाठशी उभा राहील नसता.गेली अडीच वर्षे शिवसानिकांनी मातोश्री पाहिलं नव्हती. मुख्यमंत्री शिंदे हे दिवसरात्र जनतेची सेवा करत आहेत.दिवाळीत राज्यातील महिलांना भाऊबीज भेट म्हणून मुख्यमंत्री शिंदे हे भेट देणार आहेत.

अखेर ठरले! ठाण्यातून शिंदे गटाचे शिलेदार नरेश म्हस्के, कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर

LPG Price Cut : व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात; आजपासून लागू होणार नवे दर

आज मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट; मराठवाडा, विदर्भात पावसाचा इशारा

T20 World Cup साठी टीम इंडियाची घोषणा: पंत, यशस्वी, चहल, दुबेला संधी; रिंकू, गील राखीव खेळाडूंमध्ये

शिंदे गटाची खेळी; महिन्याभरापूर्वी आलेल्या रवींद्र वायकरांना उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारी