उल्हासनगर: अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपी अटकेत; चार दिवसांची पोलीस कस्टडी   navneet barhate
ठाणे

उल्हासनगर: अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपी अटकेत; चार दिवसांची पोलीस कस्टडी

उल्हासनगर : एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून तिला गरोदर करणाऱ्या नराधमाने, गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून तिचा गर्भपात घडवून आणला आणि सात महिन्यांचे भ्रूण जमिनीत पुरून टाकले होते.

Swapnil S

उल्हासनगर : एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून तिला गरोदर करणाऱ्या नराधमाने, गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून तिचा गर्भपात घडवून आणला आणि सात महिन्यांचे भ्रूण जमिनीत पुरून टाकले होते. या घटनेतील मुख्य आरोपी सागर ढमढेरेला पोलिसांनी अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सागर ढमढेरेने आपल्या घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला, ज्यामुळे ती सात महिन्यांची गरोदर राहिली.

हे समजल्यानंतर, हा गुन्हा लपवण्यासाठी आरोपीने आपल्या नातेवाईकांच्या मदतीने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. त्या मुलीचा सातव्या महिन्यात गर्भपात झाला आणि त्यानंतर हा प्रकार कुणालाही समजू नये म्हणून गर्भ एका ठिकाणी गुपचूप पुरण्यात आला होता. गर्भपातानंतर मुलीची तब्येत खालावत गेली आणि तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांना काही संशय आला आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तपासासाठी चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. दरम्यान, पोलिसांनी गर्भपात झालेल्या भ्रूणाचे डीएनए नमुने घेतले असून, त्याचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.

Mumbai : वीकेंडला ट्रेनने प्रवास करताय? आधीच जाणून घ्या वेळापत्रक; उद्या 'या' मार्गावर २१ तासांचा मेगाब्लॉक

नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन; फ्लाइट्स कधी आणि कोणत्या मार्गांवर सुरू होणार? जाणून घ्या सविस्तर

IPLची रणधुमाळी सुरू! बंगळुरू-हैदराबाद लढतीने आजपासून १९व्या पर्वाला शानदार प्रारंभ

नवी मुंबईतून आता थेट श्रीनगर, गोवा, तिरुपती; उद्यापासून विमानसेवांचा विस्तार, तब्बल ४६ शहरांसाठी थेट सेवा

केंद्र सरकार ८.२० लाख कोटी कर्ज घेणार; महसुली तूट भरून काढण्यासाठी निर्णय