ठाणे

Ulhasnagar : मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या दोघांचा भीषण अपघातात मृत्यू

मित्राला भेटण्यासाठी पहाटे घराबाहेर पडलेला प्रवास अखेरचा ठरला. उल्हासनगरहून दुचाकीवरून मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या दोन तरुणांचा वरप येथे भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

Swapnil S

उल्हासनगर : मित्राला भेटण्यासाठी पहाटे घराबाहेर पडलेला प्रवास अखेरचा ठरला. उल्हासनगरहून दुचाकीवरून मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या दोन तरुणांचा वरप येथे भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजू गुप्ता आणि पवन गुप्ता हे दोघे बुधवारी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून वरप येथे मित्राला भेटण्यासाठी जात होते. वरप येथील हनुमान मंदिराजवळ पोहोचल्यावर त्यांनी समोरील ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचवेळी दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट ट्रकच्या मागील चाकाखाली गेले.

अपघात इतका भीषण होता की, राजू गुप्ता आणि पवन गुप्ता या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र, तोपर्यंत दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला होता.

उल्हासनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, दोन कुटुंबांचा आधार हिरावून नेणाऱ्या या अपघाताचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

युनेस्कोकडून सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा; भारताच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा, जाणून घ्या इतिहास अन् वैशिष्ट्ये