ठाणे

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; भात, आंबा पिकामुळे शेतकरी चिंतातुर

जिल्ह्यात पहाटेपासूनच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. अद्याप पावसाची रिपरिप सुरूच आहे. या पावसामुळे उन्हाळी भात शेतीसह आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने शेतात पिकून आलेला भात शेतकऱ्यांना घरात आणणे कठीण झाले आहे.

Swapnil S

रायगड : जिल्ह्यात पहाटेपासूनच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. अद्याप पावसाची रिपरिप सुरूच आहे. या पावसामुळे उन्हाळी भात शेतीसह आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने शेतात पिकून आलेला भात शेतकऱ्यांना घरात आणणे कठीण झाले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला जाईल, या भीतीने बळीराजा हवालदिल झाला आहे.

मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. आठ दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटकला मान्सूनने घेरले असून रविवारी तिन्ही भागात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर इकडे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात पुढील सात दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

नालेसफाईची कामे रेंगाळल्याचे चित्र

रायगड जिल्ह्यात रविवारी पहाटेपासून आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकल भागांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. नालेसफाईची कामे अद्यापही रेंगाळल्याचे चित्र आहे. अवकाळी पावसामुळे अलिबाग, मुरूड, रोहा, पेण, कर्जत, माणगाव, म्हसळा, महाड, श्रीवर्धन, पोलादपूरसह अन्य तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, त्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’

‘निसार’ उपग्रहाचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण; घनदाट जंगल व अंधारातही छायाचित्र टिपण्याची क्षमता

मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल

२०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना लॉटरी! मिळणार ५०० चौरस फुटांचे घर; शासकीय भूखंडावरील अतिक्रमणधारकांना राज्य सरकारचा दिलासा

काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा