संग्रहित छायाचित्र 
ठाणे

साथीच्या आजारांनी ठाणेकर बेजार; खासगी-सरकारी दवाखान्यांत रुग्णांची गर्दी

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ठाण्यात पावसाचा जोर वाढला आहे. वातावरणातील बदलामुळे ठाणे जिल्ह्यात साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे खासगी व सरकारी दवाखान्यांत तपासणीसाठी रुग्णांची गर्दी वाढत आहे.

Swapnil S

ठाणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ठाण्यात पावसाचा जोर वाढला आहे. वातावरणातील बदलामुळे ठाणे जिल्ह्यात साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे खासगी व सरकारी दवाखान्यांत तपासणीसाठी रुग्णांची गर्दी वाढत आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर ठाण्यात मलेरिया, डेंग्यू, टायफाॅईड, लेप्टो आदींसह स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. जुलै महिन्यात ठाण्यात स्वाईन फ्लूचे १३३ रुग्ण आढळले आहेत. मात्र ऑगस्ट महिना संपत येत असताना या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून आले. ऑगस्ट महिन्यात स्वाईन फ्ल्यूचे २७ रुग्ण आढळले आहेत. तर मलेरियाच्या रुग्णांची संख्या ८३ इतकी नोंदवण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले. गेल्या वर्षी जानेवारी ते जुलै या कालावधीत ठाण्यात पालिका आणि खासगी रुग्णालयात मिळून डेंग्यूचे ९६ रुग्ण आढळून आले होते. परंतु यंदा याच कालावधीत १२२ रुग्ण सापडले आहेत.

जून आणि जुलै महिन्यांत स्वाईन फ्ल्यू आणि डायरियाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने आरोग्य केंद्रामार्फत खरबरदारी घेतली असली तरी देखील आता प्रत्येक आरोग्य केंद्रात सर्दी, ताप, खोकला आदींच्या रुग्णांची संख्या देखील वाढत असल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिका हद्दीत यंदा स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या जुलै महिन्यात अधिक दिसून आली. जानेवारी ते जुलै या कालावधीत १७८ रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र एकट्या जुलै महिन्यात ही संख्या १३३ वर गेली होती. तर ऑगस्ट महिन्यात २७ रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे महापालिका हद्दीत जानेवारी ते जुलै या कालावधीत मलेरियाचे ३७५ रुग्ण आढळून आले आहेत. ऑगस्ट महिन्यात ८३ रुग्ण आढळून आले आहेत. मागील वर्षी जानेवारी ते जुलै या कालावधीत मलेरियाच्या २१३ रुग्णांची पालिका आणि खासगी रुग्णालयांत नोंद झाली होती. यंदा त्यातही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यातही डायरीया या आजाराचे जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत १२११ रुग्ण आढळले आहेत. जुलै या आजाराचे ३३६ रुग्ण आढळले होते. ऑगस्टमध्ये मात्र ही संख्या १०६ वर आली आहे. ऑगस्टमध्ये टायफाॅईडचे दोन रुग्ण, लेप्टोचे ०६ रुग्ण सापडले आहेत.

डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ

महापालिका हद्दीत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. मागील वर्षी जानेवारी ते जुलै या कालावधीत पालिका आणि खासगी रुग्णालयांत मिळून डेंग्यूच्या ९६ रुग्णांची नोंद झाली होती. परंतु यंदा याच कालावधीत तब्बल १२२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश