ठाणे

पाण्याच्या टँकरची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू

ठाण्याच्या चोडबंदर रोडवरील उन्नती ग्रीन सर्कल, मोनालीसा हॉटेलजवळ अपघातात ३८ वर्षीय मृतक जगन्नाथ परब हा महिंद्रा कंपनीत कामाला होता तो परिवारासह हावरे सिटी, ठाणे येथे राहत होता.

Swapnil S

ठाणे : ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील उन्नती ग्रीन सर्कल येथे पाण्याच्या टँकरने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका जगन्नाथ परब(३८) या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अर्णब परब (१३) स्वयम परब (०२) हे जखमी झाल्याची घटना रविवारी (७ एप्रिल) रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातातील जखमींना उपचारार्थ रुग्णालयात नेण्यात आले.

ठाण्याच्या चोडबंदर रोडवरील उन्नती ग्रीन सर्कल, मोनालीसा हॉटेलजवळ अपघातात ३८ वर्षीय मृतक जगन्नाथ परब हा महिंद्रा कंपनीत कामाला होता तो परिवारासह हावरे सिटी, ठाणे येथे राहत होता. घटनेच्या दिवशी जगन्नाथ परब हे आपला मुलगा अर्णब परब (१३), स्वयम परब (२) यांना दुचाकीवर घेऊन जात असतानाच रस्त्यावर धावणाऱ्या पाण्याच्या टँकरने परब यांच्या दुचाकीला धडक दिल्यानंतर मागे बसलेले अर्णब आणि स्वयम हे दूर फेकले गेले, तर दुचाकी चालविणारे जगन्नाथ परब हे मोटारसायकलसह टँकरच्या टायरखाली सापडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आता जनगणना 'तुमच्या' हातात! देशात पहिल्यांदाच डिजिटल जनगणना; मोबाईलवरच माहिती भरण्याची नवी सुविधा

वसई-विरारमध्ये पाणीटंचाईचा इशारा! ४ एप्रिलपासून आठवडाभर पाणीपुरवठा विस्कळीत; कोणत्या भागात कधी पाणी बंद? जाणून घ्या

पुण्यात अवकाळी पावसाचा कहर! रस्ते जलमय, वाहनं अडकली; Video व्हायरल

मुंबईकरांसाठी खुशखबर! बोरीवली-ठाणे प्रवास फक्त १५ मिनिटांत, बोगद्याच्या कामाला सुरुवात

AAPचा मोठा निर्णय! खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवले; भाषणावरही बंदी, नेमकं कारण काय?