महिलेने रिक्षात दिला बाळाला जन्म; उल्हासनगरात वाहतूककोंडीचा परिणाम 
ठाणे

महिलेने रिक्षात दिला बाळाला जन्म; उल्हासनगरात वाहतूककोंडीचा परिणाम

एका बाजूला असह्य प्रसूती वेदना, दुसरीकडे रस्त्यावर वाहनांची न संपणारी रांग... रुग्णालय गाठण्यासाठी प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असताना वाहतूककोंडीने गर्भवती महिलेची वाट रोखली. अखेर रुग्णालयापर्यंत पोहोचण्याआधीच तिने रिक्षात बाळाला जन्म दिला.

Swapnil S

उल्हासनगर : एका बाजूला असह्य प्रसूती वेदना, दुसरीकडे रस्त्यावर वाहनांची न संपणारी रांग... रुग्णालय गाठण्यासाठी प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असताना वाहतूककोंडीने गर्भवती महिलेची वाट रोखली. अखेर रुग्णालयापर्यंत पोहोचण्याआधीच तिने रिक्षात बाळाला जन्म दिला.

मंगळवारी दुपारी गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्याने तिला रिक्षातून उल्हासनगर-३ येथील रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र वाहतूककोंडी झाल्याने रिक्षा अडकून पडली. रुग्णालय गाठण्यापूर्वीच महिलेने रिक्षात बाळाला जन्म दिला. त्यानंतर माता आणि नवजात बाळाला तातडीने उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले.

आपत्कालीन रुग्णांसाठी कोंडी ठरतेय जीवघेणी

डॉक्टर आणि परिचारिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोघांनाही तत्काळ उपचारासाठी दाखल केले. या घटनेमुळे उल्हासनगरमधील सातत्याने वाढणाऱ्या वाहतूककोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः रुग्णवाहिका, गर्भवती महिला आणि अन्य आपत्कालीन रुग्णांसाठी ही कोंडी जीवघेणी ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

APMC मध्ये कोथिंबीर तेजीत; स्वयंपाकघराची चवच बिघडली, जुडीचा भाव थेट ४५ रुपयांवर, आवक घटल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

दुष्काळ पाहणीसाठी येणार केंद्राचे पथक; पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य - फडणवीस

रामशेठ ठाकूर यांचा पुरस्कार प्रदान सोहळा आज; मुख्यमंत्री फडणवीस, ठाकरे बंधू राहणार उपस्थित

Mumbai : डोसामध्ये उंदीर सापडल्याचा बनाव; खंडणीवसुलीप्रकरणी दोन महिलांना अटक

पक्षांतर करणाऱ्यांना चिन्ह देता येईल का? शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल