बदाम, व्हाइट चॉकलेट अन् केशरचा भन्नाट संगम! घरच्या घरी बनवा खास क्रीमी डेझर्ट

बदाम मिल्क मूस म्हणजेच मऊ आणि क्रीमी डेझर्ट आणि आल्मंड बिस्किट हा भन्नाट पर्याय आहे. बदामाचे दूध, व्हाइट चॉकलेट, क्रीम, केशर आणि...
बदाम, व्हाइट चॉकलेट अन् केशरचा भन्नाट संगम! घरच्या घरी बनवा खास क्रीमी डेझर्ट
Published on

गोड खाण्याची इच्छा झाली की नेहमीचे आईस्क्रीम, केक किंवा मिठाई खाण्यापेक्षा काहीतरी हटके ट्राय करायचे असेल, तर बदाम मिल्क मूस म्हणजेच मऊ आणि क्रीमी डेझर्ट आणि आल्मंड बिस्किट हा भन्नाट पर्याय आहे. बदामाचे दूध, व्हाइट चॉकलेट, क्रीम, केशर आणि वेलची यांच्या मिश्रणातून तयार होणारा मूस आणि स्वादिष्ट लागतो. त्यासोबत कुरकुरीत आल्मंड बिस्किटाची जोडी या डेझर्टची चव आणखी खुलवते. चला तर मग, घरच्या घरी ही खास रेसिपी कशी बनवायची ते जाणून घेऊया.

साहित्य :

बदाम मिल्क मूससाठी

  • ४५ ग्रॅम बदामाचे काप

  • १५० मिली बदामाचे दूध

  • ४२५ ग्रॅम व्हाइट चॉकलेट

  • ४०० मिली बेकरी क्रीम

  • ५ अंड्यांचे बलक

  • ५० ग्रॅम बारीक साखर

  • अर्धा ग्रॅम केशर

  • अर्धा टीस्पून वेलची पावडर

बदाम, व्हाइट चॉकलेट अन् केशरचा भन्नाट संगम! घरच्या घरी बनवा खास क्रीमी डेझर्ट
फक्त १५ मिनिटांत तयार करा सीताफळ अन् बदामाची टेस्टी स्मूदी; वाचा सोपी रेसिपी

आल्मंड बिस्किटसाठी

  • ७५ ग्रॅम अनसॉल्टेड बटर

  • १०० ग्रॅम कॅस्टर शुगर

  • १ अंडे

  • १ ग्रॅम बेकिंग सोडा

  • ३ ग्रॅम बेकिंग पावडर

  • ५० ग्रॅम सालीसह बदाम

  • २५ ग्रॅम बदाम पावडर

  • १ लिंबाची किसलेली साल

  • आवश्यकतेनुसार मैदा

कृती :

बदाम मिल्क मूस कसा बनवायचा?

१. बदाम भाजून घ्या - ओव्हन १८० अंश सेल्सिअसवर प्रीहीट करा. बदामाचे काप साधारण ४ मिनिटे किंवा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.

२. बदाम मिल्क आणि चॉकलेटचे मिश्रण तयार करा - बदामाचे दूध गरम करून त्यात व्हाइट चॉकलेट घाला. चॉकलेट पूर्ण वितळल्यानंतर त्यात केशर आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिसळा.

बदाम, व्हाइट चॉकलेट अन् केशरचा भन्नाट संगम! घरच्या घरी बनवा खास क्रीमी डेझर्ट
बटाट्याला द्या नवा ट्विस्ट! झटपट तयार करा खमंग 'आलू कुरकुरे'

३. अंड्याचा बलक फेटा - एका भांड्यात अंड्याचे बलक आणि साखर घेऊन ते क्रीमी आणि हलके होईपर्यंत फेटून घ्या.

४. क्रीम मिसळा - बेकरी क्रीम चांगली फेटून घ्या. त्यानंतर चॉकलेट-बदामाच्या मिश्रणात फेटलेले अंड्याचे बलक हलक्या हाताने मिसळा. शेवटी फेटलेली क्रीम त्यात अलगद फोल्ड करा.

५. मूस सेट होऊ द्या - तयार मिश्रण कप किंवा ग्लासमध्ये ओता आणि फ्रिजमध्ये ठेवून चांगले सेट होऊ द्या.

बदाम, व्हाइट चॉकलेट अन् केशरचा भन्नाट संगम! घरच्या घरी बनवा खास क्रीमी डेझर्ट
Sunday Special : हॉटेलसारखे कुरकुरीत फिश कटलेट आता घरच्या घरी; ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा

आल्मंड बिस्किट कसे बनवायचे?

१. बदाम चिरून घ्या - सालीसह बदाम साधारण चिरून घ्या.

२. बटर आणि साखर फेटा - एका भांड्यात बटर आणि कॅस्टर शुगर घेऊन हलके आणि क्रीमी होईपर्यंत फेटा. त्यात अंडे घालून पुन्हा व्यवस्थित फेटून घ्या.

३. कोरडे साहित्य मिसळा - मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, बदाम पावडर आणि लिंबाची किसलेली साल घाला. सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा.

४. बदाम मिसळून बेक करा - चिरलेले बदाम मिश्रणात घाला. त्याचा लांबट रोल तयार करून १८० अंश सेल्सिअसवर सुमारे २० मिनिटे बेक करा.

बदाम, व्हाइट चॉकलेट अन् केशरचा भन्नाट संगम! घरच्या घरी बनवा खास क्रीमी डेझर्ट
बटर, मसाला अन् भाज्यांचा तडका! 'अशी' बनवा घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल तवा इडली

५. बिस्किट कुरकुरीत करा - बेक केलेला रोल थंड होऊ द्या. त्याचे पातळ काप करून पुन्हा १५० अंश सेल्सिअसवर ८ ते १० मिनिटे बेक करा. बिस्किटे कुरकुरीत झाल्यावर बाहेर काढा.

६. सर्व्ह करा - सेट झालेल्या बदाम मिल्क मूसवर भाजलेल्या बदामाचे काप घाला आणि सोबत कुरकुरीत आल्मंड बिस्किट सर्व्ह करा.

टिप्स :

  • मूस मऊ आणि हलका ठेवण्यासाठी क्रीम जास्त फेटू नका.

  • व्हाइट चॉकलेट वितळवताना थेट जास्त आचेवर ठेवू नका. मिश्रण जळण्याची शक्यता असते.

  • मूस सर्व्ह करण्यापूर्वी फ्रिजमध्ये व्यवस्थित सेट होऊ द्या.

  • बिस्किट अधिक कुरकुरीत हवे असल्यास दुसऱ्यांदा बेक करताना त्यावर लक्ष ठेवा, कारण पातळ काप लवकर भाजले जातात.

  • केशर आणि वेलचीचे प्रमाण चवीनुसार कमी-जास्त करू शकता.

  • मूस आणि बिस्किट एकत्र सर्व्ह केल्यास मऊ आणि कुरकुरीत टेक्स्चरचा छान मेळ मिळतो.

logo
marathi.freepressjournal.in