Kitchen Tips : मसाले लवकर खराब होतात? 'या' सोप्या टिप्स वापरा; वर्षभर राहतील फ्रेश

मसाले बनवतानाच आणि साठवताना काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या, तर त्यांची चव आणि गुणवत्ता दीर्घकाळ टिकून राहू शकते.
Kitchen Tips : मसाले लवकर खराब होतात? 'या' सोप्या टिप्स वापरा; वर्षभर राहतील फ्रेश
Kitchen Tips : मसाले लवकर खराब होतात? 'या' सोप्या टिप्स वापरा; वर्षभर राहतील फ्रेश'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

उन्हाळा सुरू झाला की घराघरांत मसाले तयार करण्याची लगबग सुरू होते. लाल तिखट, हळद, धणे पूड असे विविध मसाले करून साठवले जातात. पण हे मसाले वर्षभर ताजे, सुगंधी आणि खराब न होता कसे टिकवायचे, हा अनेकांचा प्रश्न असतो. योग्य काळजी घेतली नाही तर मसाल्यांचा वास कमी होतो, किड लागते किंवा ते लवकर खराब होतात. म्हणूनच मसाले बनवतानाच आणि साठवताना काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या, तर त्यांची चव आणि गुणवत्ता दीर्घकाळ टिकून राहू शकते.

Kitchen Tips : मसाले लवकर खराब होतात? 'या' सोप्या टिप्स वापरा; वर्षभर राहतील फ्रेश
सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मूग वडे; सोपी आणि टेस्टी रेसिपी नक्की ट्राय करा

काचेच्या बरण्यांचा वापर करा

मसाले साठवण्यासाठी काचेच्या एअरटाइट बरण्या हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. प्लास्टिकच्या डब्यांमध्ये मसाले ठेवल्यास त्यांचा सुगंध लवकर उडून जातो. काचेच्या बरण्यांमुळे मसाल्यांचा नैसर्गिक वास आणि गुणवत्ता टिकून राहते.

Kitchen Tips : मसाले लवकर खराब होतात? 'या' सोप्या टिप्स वापरा; वर्षभर राहतील फ्रेश
Beauty Tips : घरच्या घरी बनवा नैसर्गिक टोनर; घरगुती साहित्याने वाढवा त्वचेची चमक

सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा

मसाले नेहमी थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावेत. जास्त प्रकाशामुळे मसाल्यांचा रंग फिका पडतो आणि त्यांची चवही कमी होते. त्यामुळे मसाले साठवण्यासाठी अंधारी आणि कोरडी जागा निवडणे अधिक योग्य ठरते.

Kitchen Tips : मसाले लवकर खराब होतात? 'या' सोप्या टिप्स वापरा; वर्षभर राहतील फ्रेश
Sunday Special Recipe : घरीच बनवा मसालेदार स्टफ्ड पापलेट फ्राय; पाहुण्यांसाठी परफेक्ट डिश, वाचा रेसिपी

हिंगाचा वापर करा

लाल तिखट किंवा इतर मसाल्यांमध्ये छोटासा हिंगाचा तुकडा ठेवला, तर त्यात किड लागत नाही. ही पारंपरिक आणि प्रभावी पद्धत असून अनेक घरांमध्ये अजूनही वापरली जाते.

Kitchen Tips : मसाले लवकर खराब होतात? 'या' सोप्या टिप्स वापरा; वर्षभर राहतील फ्रेश
Kitchen Tips : दररोजच्या स्वयंपाकासाठी उपयुक्त स्मार्ट ट्रिक्स; काम होईल सोपं

ओल्या हातांनी मसाले हाताळू नका

मसाले काढताना किंवा वापरताना हात पूर्णपणे कोरडे असणे अत्यंत गरजेचे आहे. ओलसर हातामुळे मसाल्यांमध्ये ओलावा जाऊन ते लवकर खराब होऊ शकतात. त्यामुळे नेहमी कोरड्या चमच्याचा वापर करा.

Kitchen Tips : मसाले लवकर खराब होतात? 'या' सोप्या टिप्स वापरा; वर्षभर राहतील फ्रेश
नॉनव्हेज लव्हर्ससाठी मसालेदार अंडा घोटाळा; घरीच बनवा स्ट्रीट फूड स्टाइल टेस्टी डिश

स्वयंपाकघरातच योग्य साठवणूक

मसाले गॅसजवळ किंवा उष्णतेच्या ठिकाणी ठेवणे टाळा. उष्णतेमुळे मसाल्यांची गुणवत्ता घटते. शक्यतो थंड आणि कोरड्या ठिकाणीच त्यांची साठवणूक करावी.

Kitchen Tips : मसाले लवकर खराब होतात? 'या' सोप्या टिप्स वापरा; वर्षभर राहतील फ्रेश
Summer Special : कच्च्या कैरीची चटणी; १० मिनिटांत तयार होणारी झणझणीत रेसिपी, भाकरीसोबत लागते जबरदस्त

स्वयंपाकात चव टिकवायची असेल, तर मसाल्यांची योग्य साठवणूक ही तितकीच महत्त्वाची आहे. छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास मसाले अधिक काळ ताजे राहतात आणि अन्नाची चवही दुप्पट होते.

logo
marathi.freepressjournal.in