Akshaya Tritiya 2026 : सणासुदीला खास; घरीच बनवा बाजारासारखे मोतीचूर लाडू, ट्राय करा सोपी रेसिपी

बाजारातील लाडूंप्रमाणेच घरच्या घरी मऊ आणि स्वादिष्ट मोतीचूर लाडू सहज तयार करता येतात. जाणून घ्या सोपी रेसिपी.
Akshaya Tritiya 2026 : सणासुदीला खास; घरीच बनवा बाजारासारखे मोतीचूर लाडू, ट्राय करा सोपी रेसिपी
Akshaya Tritiya 2026 : सणासुदीला खास; घरीच बनवा बाजारासारखे मोतीचूर लाडू, ट्राय करा सोपी रेसिपी'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

अक्षय्य तृतीयानिमित्त घराघरांत गोड पदार्थ बनवण्याची परंपरा आहे. या सणासाठी मोतीचूर लाडू मोठ्या आवडीने बनवले जातात. बाजारातील लाडूंप्रमाणेच घरच्या घरी मऊ आणि स्वादिष्ट मोतीचूर लाडू सहज तयार करता येतात. जाणून घ्या सोपी रेसिपी.

साहित्य :

  • बेसन - २ कप

  • पाणी (पीठ भिजवण्यासाठी)

  • मीठ - चिमूटभर

  • हळद - चिमूटभर

  • खाण्याचा सोडा - चिमूटभर

  • तेल - तळण्यासाठी

Akshaya Tritiya 2026 : सणासुदीला खास; घरीच बनवा बाजारासारखे मोतीचूर लाडू, ट्राय करा सोपी रेसिपी
झणझणीत बोंबील-मिरचीचा ठेचा; भाकरीसोबत लागेल भारी, वाचा रेसिपी

पाकासाठी :

  • साखर - १ कप

  • पाणी - १/२ कप

  • केशरी रंग (आवडीनुसार)

इतर :

  • वेलदोडा पूड

  • खरबूज/कलिंगड बिया

  • तूप

  • चांदीचा वर्ख, गुलाब पाकळ्या - सजावटीसाठी

Akshaya Tritiya 2026 : सणासुदीला खास; घरीच बनवा बाजारासारखे मोतीचूर लाडू, ट्राय करा सोपी रेसिपी
Akshaya Tritiya 2026 : पुरीसोबत परफेक्ट! गोड-सुगंधी आमरस; घरच्या घरी बनवा सोपी रेसिपी

कृती :

बेसनात पाणी घालून गुळगुळीत, पातळ पीठ तयार करा. त्यात मीठ, हळद आणि थोडासा सोडा घालून एकजीव करा. हे पीठ बुंदी बनवण्यासाठी झाऱ्यात (छिद्र असलेल्या चमच्यात) घालून गरम तेलात छोटे-छोटे बुंदी तळून घ्या.

दुसऱ्या भांड्यात साखर आणि पाणी घालून एकतारी पाक तयार करा. त्यात थोडासा केशरी रंग घाला. गरम बुंदी तयार पाकात टाका आणि नीट मिक्स करा. त्यात वेलदोडा पूड, बिया आणि थोडे तूप घालून एकत्र करा. मिश्रण कोमट असतानाच हाताला तूप लावून लाडू वळा. शेवटी चांदीचा वर्ख आणि गुलाब पाकळ्यांनी सजवा.

Akshaya Tritiya 2026 : सणासुदीला खास; घरीच बनवा बाजारासारखे मोतीचूर लाडू, ट्राय करा सोपी रेसिपी
घरच्या घरी बनवा चटपटीत पनीर सँडविच; सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

टिप्स :

  • बुंदी जास्त कुरकुरीत न तळता मऊ ठेवावी.

  • पाक एकतारीच असावा, जास्त घट्ट नको.

  • लाडू वळताना मिश्रण कोमट असणे महत्त्वाचे.

  • थोडे दूध घातल्यास लाडू अधिक मऊ होतात.

  • वेलदोडा आणि केशर घातल्यास सुगंध वाढतो.

अक्षय्य तृतीयाच्या सणासाठी घरच्या घरी बनवलेले मोतीचूर लाडू केवळ चविष्टच नाहीत, तर सणाची गोडीही वाढवतात. ही सोपी रेसिपी ट्राय करून पाहा.

logo
marathi.freepressjournal.in