

उन्हाळा सुरू झाला की उकाडा, घाम आणि आरोग्याच्या तक्रारी वाढू लागतात. अनेकदा आपण उष्णतेपासून बचावासाठी काही सवयी अंगीकारतो, पण त्या उलट आरोग्यावर परिणाम करतात. मात्र, आयुर्वेदात या चुकांवर सोपे आणि प्रभावी उपाय दिले आहेत.
उन्हाळ्यातील सामान्य आरोग्य समस्या
भारतासारख्या उष्ण देशात उन्हाळ्यात उष्माघात (हीट स्ट्रोक), डिहायड्रेशन (पाण्याची कमतरता), त्वचारोग (रॅशेस, ॲलर्जी, सनबर्न), श्वसनाचे आजार (अस्थमा, ॲलर्जी), अन्न विषबाधा आणि पोटाचे त्रास या समस्या सामान्यपणे दिसतात.
उन्हाळ्यातील ४ मोठ्या चुका आणि आयुर्वेदिक उपाय
१) पुरेसे पाणी न पिणे
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता थकवा, चक्कर आणि उष्माघाताला कारणीभूत ठरते
उपाय :
दिवसातून भरपूर पाणी प्या
नारळपाणी, ताक, लिंबूपाणी, कैरीचं पन्ह, सत्तू पाणी, बेल सरबत यांचा समावेश करा.
२) कडाक्याच्या उन्हात बाहेर जाणे
सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत सूर्याची तीव्रता जास्त असते.
उपाय :
शक्यतो या वेळेत बाहेर जाणे टाळा.
आवश्यक असल्यास पाण्याची बाटली सोबत ठेवा.
जड शारीरिक काम टाळा.
३) त्वचेची काळजी न घेणे
उन्हाळ्यात त्वचेवर सनबर्न, ॲलर्जी, कोरडेपणा वाढतो.
उपाय :
बाहेर जाण्यापूर्वी SPF ४० किंवा अधिक सनस्क्रीन लावा.
दर २ तासांनी पुन्हा लावा.
हलके, जेल-आधारित मॉइश्चरायझर वापरा.
गुलाबपाणी, ॲलोवेरा, काकडीसारखी थंडावा देणारी उत्पादने वापरा.
सुती आणि लिनेनचे हलके कपडे घाला.
टोपी किंवा छत्री वापरा.
४) चुकीचे अन्न सेवन
उष्णतेपासून बचावासाठी आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स, थंड पाणी जास्त प्रमाणात घेतले जाते. यामुळे पचन बिघडू शकते किंवा सर्दी-खोकला होऊ शकतो.
उपाय :
काकडी, टरबूज, खरबूज, द्राक्षे, लिची, दही यांचा आहारात समावेश करा.
पुदिन्याचा वापर करा.
तिखट आणि तेलकट पदार्थ कमी खा.
हलके पदार्थ जसे डाळ, भाजी, पालेभाज्या खा.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)