उन्हाळ्यात बनवा परफेक्ट ताकाची कढी! 'या' ७ टिप्स लक्षात ठेवा; कढी कधीच फुटणार नाही

उन्हाळ्यात हलकं, पचायला सोपं आणि चविष्ट जेवण हवं असेल, तर ताकाची कढी हा उत्तम पर्याय आहे. मात्र कढी फाटण्याची समस्या टाळण्यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जाणून घ्या ताकाची कढी परफेक्ट बनवण्याचे उपाय.
उन्हाळ्यात बनवा परफेक्ट ताकाची कढी! 'या' ७ टिप्स लक्षात ठेवा; कढी कधीच फुटणार नाही
उन्हाळ्यात बनवा परफेक्ट ताकाची कढी! 'या' ७ टिप्स लक्षात ठेवा; कढी कधीच फुटणार नाही
Published on

उन्हाळा सुरू झाला की पोटाला हलकं आणि थंडावा देणारं अन्न खावंसं वाटतं. अशा वेळी ताकाची कढी हा एकदम परफेक्ट पर्याय ठरतो. चवदार, पचायला हलकी आणि शरीराला थंडावा देणारी ही कढी घराघरांत आवडीने केली जाते. मात्र कधी कधी कढी फुटते किंवा चव बिघडते. म्हणूनच योग्य रेसिपी आणि काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या, तर कढी एकदम परफेक्ट होते.

ताकाची कढी सोपी रेसिपी

साहित्य
ताक - १ लिटर
बेसन - २ ते ३ मोठे चमचे
आलं-लसूण-हिरवी मिरची पेस्ट - १ चमचा
मीठ - चवीनुसार
साखर किंवा गूळ - चवीनुसार
तूप - १ चमचा
जिरं, मोहोरी, हिंग, कढीपत्ता - फोडणीसाठी

उन्हाळ्यात बनवा परफेक्ट ताकाची कढी! 'या' ७ टिप्स लक्षात ठेवा; कढी कधीच फुटणार नाही
कोकणी स्टाईल कैरीची आंबटगोड कढी; भातासोबत लागते भन्नाट! करून पाहा ही सोपी रेसिपी

कृती
ताक आणि बेसन एकत्र करून गुठळ्या न होऊ देता नीट फेटून घ्या.
गॅसवर ठेवून सतत ढवळत राहा आणि उकळी येऊ द्या.
दरम्यान तुपात आलं-लसूण-मिरची पेस्ट परतून घ्या आणि कढीत घाला.
उकळी आल्यावर शेवटी मीठ आणि थोडी साखर किंवा गूळ घालून चव सांभाळा.
तुपाची फोडणी देऊन गरमागरम सर्व्ह करा.

उन्हाळ्यात बनवा परफेक्ट ताकाची कढी! 'या' ७ टिप्स लक्षात ठेवा; कढी कधीच फुटणार नाही
झटपट आणि कुरकुरीत मिक्स भाज्यांचा कटलेट; संध्याकाळच्या चहा किंवा नाश्त्यासाठी परफेक्ट!

कढी परफेक्ट होण्यासाठी लक्षात ठेवा ...

कढीसाठी योग्य ताक निवडा
कढीसाठी ताक खूप आंबट किंवा खूप पातळ नसावे. मध्यम आंबट ताक वापरल्यास कढीची चव संतुलित आणि छान लागते.

बेसन व्यवस्थित मिसळा
ताकामध्ये बेसन घालताना गुठळ्या होणार नाहीत, याची काळजी घ्या. साधारण १ लिटर ताकासाठी २ ते ३ मोठे चमचे बेसन पुरेसे ठरते.

सतत ढवळत राहा
कढी गॅसवर ठेवल्यानंतर पहिली उकळी येईपर्यंत सतत ढवळणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे कढी फुटण्याची शक्यता कमी होते.

उन्हाळ्यात बनवा परफेक्ट ताकाची कढी! 'या' ७ टिप्स लक्षात ठेवा; कढी कधीच फुटणार नाही
बाजारच्या आईस्क्रीमला द्या ब्रेक; घरच्या घरी बनवा स्वादिष्ट मटका कुल्फी

आलं-लसूण-मिरचीचे वाटण वापरा
कढीला खास चव येण्यासाठी आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीचे ताजे वाटण तेलात किंवा तुपात परतवून घ्या. यामुळे कढी अधिक स्वादिष्ट बनते.

गोड-आंबट चव संतुलित ठेवा
कढीमध्ये थोडी साखर किंवा गूळ घातल्यास आंबटपणा संतुलित होतो आणि चव अधिक खुलते.

मीठ शेवटीच घाला
कढीला उकळी आल्यानंतरच मीठ घालावे. सुरुवातीला मीठ घातल्यास कढी फुटण्याची शक्यता वाढते.

तुपाची फोडणी द्या
कढीला शेवटी साजूक तुपाची फोडणी दिल्यास तिचा सुगंध आणि चव दोन्ही वाढतात. जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता यांसोबत लवंग-दालचिनी घातल्यास अजून छान फ्लेवर येतो.

उन्हाळ्यात बनवा परफेक्ट ताकाची कढी! 'या' ७ टिप्स लक्षात ठेवा; कढी कधीच फुटणार नाही
१० मिनिटांत झटपट नाश्ता! चविष्ट 'पिझ्झा टोस्ट सँडविच'; मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची पसंती

उन्हाळ्यात पोटाला हलकं, चविष्ट आणि आरोग्यदायी काहीतरी खायचं असेल, तर ताकाची कढी नक्की ट्राय करा. योग्य टिप्स वापरल्यास कढी नेहमीच छान आणि न फाटता तयार होते.

logo
marathi.freepressjournal.in